Advertisement

शिंदे गट विरुद्ध शिवसेना : पोलिसांनी कोणती कलमं लावली की, मुंबईतील कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आली

शिंदे गट आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष : राड्यामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा का सुरू झालीये?
mumbai law and order : eknath shinde faction vs uddhav thackeray faction
mumbai law and order : eknath shinde faction vs uddhav thackeray faction

शुक्रवारी मध्यरात्रीपासून दादरमधल्या राड्याबरोबर चर्चा आहे, ती मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेची. उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गटातल्या राड्यावेळी दोन्ही गटातले पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर आले. बाचाबाची झाली. शिवागाळ झाली आणि मराहाणही झाली. तसंच ठाकरे गटाने केलेल्या आरोपानुसार या राड्यात गोळीबारही झाला. या सगळ्यांमुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

शुक्रवारी म्हणज अनंत चतुर्थदशीच्या रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यात दोन्ही गटांनी एकमेकावंर आरोप केलेत. शिंदे गटाने माराहाण केल्याचा आणि चोरीचा आरोप ठाकरे गटावर केला आहे. तर, ठाकरे गटाने सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आरोपांवरुन परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करुन घेतले आहेत.

पोलिसांनी केलेल्या FIR मध्ये काय आहे?

शिंदे गटाचे दादरचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या आरोपानंतर दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी संतोष तेलवणे यांच्यावर आणि शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. ठाकरे गटाचे दादरचे विभागप्रमुख महेश सावंत आणि इतर कार्यकर्त्यांनी दगड फेकून आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप तेलवणेंनी केलाय. त्याचबरोबर संतोष तेलवणे यांनी त्यांच्या गळ्यातील २ लाख ६० हजाराची चेन जमावाने चोरल्याचाही आरोप केलाय.

या आरोपांवरुन ठाकरे गटातील महेश सावंत यांच्यासह 30 कार्यकर्त्यांवर (IPC कलम) 143 बेकयादेशीरपण जमणे, (IPC कलम 147) दंगल घडवणे, (IPC कलम 148) दंगल घडवणे आणि प्राणघातक शस्त्र बाळगणे, (IPC कलम) 395 दरोडा घालणे (IPC कलम 324 ), प्राणघातक शस्त्राने ईजा करणे, (IPC कलम 323) ईजा करणे, (IPC कलम 504) हेतुपुरस्सर अपमान करणे (IPC कलम 506 धमकावणे) हे आरोप FIR मध्ये ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवर लावण्यात आले आहेत. पुरेशा पुराव्यांअभावी दरोडा टाकण्याचं कलम रद्द केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणी ठाकरे गटातले महेश सावंत यांच्यासह 5 शिवसैनिकांना रविवारी दादर पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. महेश सांवत आणि त्यांच्याबरोबर शिवसैनिक हे तलवारी, चॉपर आणि बांबू, काठ्या घेऊन आले होते, असा आरोप संतोष तेलवणे पोलिसांना दिलेल्या जबाबात केलेला आहे.

रविवारी दुपारी दादरमधल्या राड्याच्या प्रकरणात दुसरी FIR दाखल करण्यात आली. दिवसभर शिवसेनेचे खासदार अरविंद सावतं, आमदार अनिल परब, आमदार सुनिल शिंदे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनाबाहेर आंदोलन केल्यानंतर हा FIR दाखल करण्यात आला.

शिवसेनेने केलेल्या या FIR मध्ये आमदार सदा सरवणकर, संतोष तेलवणे आणि समाधान सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भादंवि कलम १४३, १४४, १४५, १४७, १४८ आणि १४९ अंतर्गत दंगल आणि बेकायदेशीरपणे जमा होणं. त्याचबरोबर भादंवि कलम ३३६ अंतर्गत जीव धोक्यात घालणे, कलम १८६ अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कामात अडथळा निर्माण करणे, भादंवि कलम ५०४ हेतूपुरस्सर अपमान करणं, शस्त्र कायद्यातील कलम ३ आमि २५ नुसार बंदुकीचा वापर आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) आणि १३५ पोलीस आयुक्तांच्या आदेशाचं उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले गेले आहेत.

हे आरोप शिंदे गटावर लावण्यात आले आहेत. ठाकरे गटाने सदा सरवणकरांनी दोनदा गोळीबार केल्याचा आरोप केलाय त्यावरुन पोलिसांनी स्युमोटो दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात येत्या काही दिवसात अटक होणार आहे.

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांमध्ये संघर्ष झाला आणि प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. पण, महत्त्वाच म्हणजे FIR मध्ये पोलिसांनी लावलेली कलमं ही शिंदे आणि ठाकरे गटामध्ये राड्यामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची जाणीव करुन देणारी आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in