Mumbai Tak /बातम्या / गुजरातीबद्दल मला प्रेम, गुजराती-मराठी महाराष्ट्रात दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत: CM
बातम्या राजकीय आखाडा

गुजरातीबद्दल मला प्रेम, गुजराती-मराठी महाराष्ट्रात दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत: CM

मुंबई: ‘मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे… गुजराती आणि मराठी महाराष्ट्रात दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ‘मुंबई समाचार’ या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एका विशेष कार्यक्रम आज (14 जून) आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजर होते.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात गुजराती जनता महाराष्ट्रात एकरुप झाली असल्याचं म्हटलं आहे. तसंच गुजरात आणि महाराष्ट्र.. गुजराती आणि मराठी… हे अधिकाधिक दृढ होत जावो असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पाहा मुंबई समाचारच्या भाषणात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले:

‘मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे. मला गुजराती समजतं पण बोलू शकत नाही. आता मुंबई समाचार उद्यापासून सुरु करतो. नरेंद्र भाई मला खरंच विश्वास बसत नाहीए आजच्या कार्यक्रमाबद्दल. एका वृत्तपत्राला दोनशे वर्ष होतायेत.. दोनशे वर्ष.. मला अभिमान आहे, आनंद आहे की, आपल्या महाराष्ट्रात गुजराती वृत्तपत्र 200 वर्ष वाटचाल करतं याचा मला अभिमान आहे. आणि तुम्ही सगळे एवढ्या टाळ्या वाजवतायेत म्हणजे तुम्हाला मराठी येतंय. हेच तर आपलं नातं आहे. गुजराती आणि मराठी आपल्या महाराष्ट्रात दुधात साखरेसारखे विरघळून गेलेले आहेत.’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थितांची मनं जिंकली.

‘1822 साली वृत्तपत्र सुरु केलं. मोदीजी 1818 साली पेशवाई गेली आणि इंग्रजांचं राज्य सुरु झालं. तिथपासून आतापर्यंत जर जुन्या बातम्या काढल्या तर आजवरचा संपूर्ण इतिहास एका वृत्तपत्राच्या कार्यालयात मिळेल.’ असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

‘वृत्तपत्र चालवणं किती कठीण असतं ते मला माहिती आहे. आम्ही पण चालवतो वृत्तपत्र. काही-काही वृत्तपत्र ही चळवळीमध्ये जन्म घेतात. जसं आचार्य अत्रेंचा मराठा होता. जो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जन्माला आला. आज सुद्धा आपल्या लोकमान्यांचा केसरी पेपर सुरु आहे. ही वृत्तपत्र इतिहासाचे साक्षीदार आहेतच पण ऐतिहासिक काम करणारे देखील आहेत.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘म्हणजे ज्या केसरीमधून लोकमान्यांनी तेव्हाच्या इंग्रज सरकारला सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा खडखडीत सवाल विचारला होता. त्या वृत्तपत्राला 141 वर्ष झाली आहेत.’ असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यपाल कोश्यारींनी पंतप्रधानांसमोरच छेडला औरंगाबादचा पाणी प्रश्न, म्हणाले…

‘आता तंत्रज्ञान विकसित झालं आहे. प्रत्येक गोष्टी.. त्यावर तुमची मतं असतील. कारण वृत्तपत्र हा एक आरसा असतो. जो समाजाला पण दाखवता येतो आणि आम्हा राज्यकर्त्यांना दाखवता येतो. कोण कुठे चुकतोय आणि योग्य दिशेने कसं जायचं हे सांगण्याचं काम, कर्तव्य वृत्तपत्र, पत्रकार करत असतात.’ असं सांगण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

‘आपलं हे जे नातं आहे गुजरात आणि महाराष्ट्र.. गुजराती आणि मराठी… हे अधिकाधिक दृढ होत जावो अशा अपेक्षा व्यक्त करतो.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंबई समाचारच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × one =

प्रियंका चोपडाने घातले ‘इतके’ महागडे शुज, किंमत एकूण धक्का बसेल राखी सावंत म्हणालेली, ‘सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं’ अनिल अंबानी जेव्हा मदतीसाठी निता अंबानींना म्हणाले होते, “Thank You भाभी” या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही! Chatbot ने असं काय सांगितलं की, तरुणाने थेट केली आत्महत्या?, AIचे खतरनाक रूप Sai Tamhankar Troll : ‘श्रीमंतांची उर्फी’ म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल! IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण? दही खाण्याचे भरपूर चमत्कारी फायदे, यापैकी तुम्हाला किती माहितीये? ‘सनी लिओनी तू भारत सोडून जा’, राखी सावंतने काय केले होते आरोप? ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार! एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या…Video व्हायरल ‘या’ 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं खास गुपित इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो Bollywood : जेव्हा प्रियांका चोप्राला दिला होता स्तनांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग! जन्मताच ‘या’ चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय? Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली?