Uddhav Thackeray: 'माझ्या पाठीत वार करा, आरेचा निर्णय रेटून मुंबईच्या काळजात खंजीर खुपसू नका!'

आरे कारशेडच्या मुद्द्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कडाडून विरोध
hit me in the back but don't put the dagger in the heart of Mumbai with aarey carshed decision Says Uddhav Thackeray
hit me in the back but don't put the dagger in the heart of Mumbai with aarey carshed decision Says Uddhav Thackeray फोटो सौजन्य - India Today

आरे कारशेडचा आता पुढे आणला जातो आहे. तो आणून मुंबईच्या काळजात खंजीर खुपसू नका असं कळकळीचं आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आरेमध्ये मेट्रोचं कारशेड उभारलं तर वन्यजीव धोक्यात येतील असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी?

नवनिर्मित सरकारचं मी अभिनंदन केलंय, पुन्हा एकदा अभिनंदन करतो. या सरकारने चांगलं काम करावं ही अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने सरकार स्थापन करण्यात आलं तसंच तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचा दावा करण्यात आला. मी हेच तर अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. हेच माझं-अमित शाह यांचं हेच बोलणं झालं होतं, ही प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या वेळी अडीच अडीच वर्षे हेच ठरलं होतं. आता मग हे सगळं करण्याचं कारण काय? हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. तुम्ही जर माझं ऐकलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. आज तुम्हाला माझा चेहरा पडला आहे हे दिसत असेल. माझ्यावर राग आहे ना तो खुशाल काढा. माझ्यावर वार करा मात्र मुंबईच्या पाठीत कट्यार खुपसू नका.

मला आज त्रास होतो आहे तो आरेच्या कारशेडचा. हा निर्णय घेऊ नका, मुंबईत ते जंगल साफ करू नका. माझी हात जोडून विनंती आहे की आरे कारशेडच्या रूपाने माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आत्ता तिकडे झाडं तोडून झाली आहेत. मात्र तिथे वन्य जीवन आहे.

त्या ठिकाणी रहदारी सुरू झाल्यावर वन्यजीव धोक्यात येईल. त्यामुळे आरेचा निर्णय घेऊ नका ही कळकळीची विनंती मी तुम्हाला करतो आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. हा माझा आग्रह आहे तो मुंबईकरांच्या विनंतीने. तिसरी बाब ही आहे की लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्या चारही स्तंभांनी आता लोकशाही वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. मतदान कुणी केलं हे गुप्त राहतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in