Maharashtra Opinion Poll 2024 : मविआला लोकसभेच्या 28 जागा, महायुतीची झोप उडवणारा पोल!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Even in terms of vote share, Congress Plus seems to be getting the lead. Congress Plus will get 41 percent votes while BJP Plus can get 37 percent votes. 22 percent of voters' votes are seen going to other parties.
Even in terms of vote share, Congress Plus seems to be getting the lead. Congress Plus will get 41 percent votes while BJP Plus can get 37 percent votes. 22 percent of voters' votes are seen going to other parties.
social share
google news

Maharashtra Lok Sabha Opinion Poll 2024 : एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही भाजपचं महाराष्ट्रात टेन्शन कमी होताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मुसंडी मारेल, असे अंदाज एका ओपिनियन पोलमधून समोर आले आहेत. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के जास्त मते मिळणार असल्याचा निष्कर्ष यातून समोर आला आहे. (abp-c voter lok sabha opinion poll maharashtra 2024)

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने एबीपी-सी व्होटर्सने सर्व्हेक्षण केले. या ओपिनियन पोलचे निष्कर्ष भाजपसह शिवसेना, अजित पवार गटाचे टेन्शन वाढवणारे आहेत. (There are 48 Lok Sabha seats in Maharashtra. Here Uddhav Thackeray’s Shiv Sena, Sharad Pawar’s NCP and Congress are part of the India alliance, while Ajit Pawar’s NCP, Eknath Shinde’s Shiv Sena and BJP are the components of NDA.)

महाराष्ट्रात सध्या कसे आहे राजकीय समीकरण?

2019 मध्ये महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली. विरोधी विचाराधारा असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने आघाडी केली. मात्र, शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट हे भाजप प्रणित एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे म्हटले जात होते. मात्र, सी व्होटरच्या ओपिनियन पोलमधून वेगळीच स्थिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> काँग्रेसला मोठा झटका! सुनील केदार यांची आमदारकी रद्द

ओपिनियन पोलमध्ये कुणाला किती जागा?

लोकसभेच्या 48 जागांपैकी सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील असा निष्कर्ष सर्व्हेतून समोर आला आहे. महाविकास आघाडी 26 ते 28 जागा मिळू शकतात. तर भाजप प्रणित एनडीएला 19 ते 21 जागा मिळू शकतात. 2 जागा इतरांना मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मविआची मतांची टक्केवारी वाढणार

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचे म्हटले जात आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या जागांवर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीची मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल, त्यांनी 25 कोटींचा चेक पाठवला”, शरद पवार काय बोलले?

ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार मतांच्या टक्केवारीबद्दल सांगायचं झालं तर काँग्रेसची टक्केवारी वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडीला 41 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला 37 टक्के मते मिळू शकतात. इतर पक्षांच्या झोळीत 22 टक्के मते जाताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT