India आघाडीच्या बैठकीतील Exclusive बातमी, ‘हा’ नेता पंतप्रधानाचा उमेदवार?
इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक झाली त्या बैठकीत आज पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करत असताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची शिफारस केली, त्याला अरविंद केजरीवाल यांनीही त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

India Alliance : संसदेत घुसखोरी झाल्यानंतर देशाचे राजकारण ढवळून निघाले असतानाच केंद्र सरकारकडून 142 खासदारांना निलंबित (MPs Suspend) करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत या दोन्ही घटनांवर चर्चा झाली असली तरी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी ममता बॅनर्जींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे नाव पुढे केल्याने त्याविषयी आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. इंडिया आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banrji) यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे असं मत मांडल्यानंतर त्यांच्या मताला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही त्याला पसंदी दर्शवत खर्गे हेच पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार असतील असंही त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
PM पदाचा उमेदवार कोण?
ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर केले, त्यानंतर त्यांच्या नावाला अरविंद केजरीवाल यांनीही सहमती दर्शवली होती. त्यावरच पत्रकारानी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा झाली असली तरी आधी आम्हाला निवडून यायचे आहे, त्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा >> IPL 2024 : हर्षल पटेलसाठीही लागली रेकॉर्डब्रेक बोली, पंजाब किंग्सने मोजले अव्वाच्या सव्वा…
खर्गेंचा नकार नाही
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत आणि आपल्या नावाला मिळालेल्या समर्थनाबाबत ते काही जास्त बोलले नाहीत. मात्र त्यांनी त्यांच्या नावाला मिळालेल्या समर्थनानंतर त्यांनी त्याबाबत नकारही दिला नाही, मात्र त्यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल असो किंवा ममता बॅनर्जी असो त्या बोलल्या असल्या तरी तो आमच्या इंडिया आघाडीतील विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील 28 राजकीय पक्ष सहभागी
इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक झाली त्या बैठकीसाठी देशातील 28 राजकीय पक्षांनी सहभाग घेतला. यावेळी सहभागी झालेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे यावर चर्चा करून आगामा काळात होणाऱ्या बैठकीच्या नियोजनाविषयीही चर्चा करण्यात आली. यावेळी सांगण्यात आले की, इंडिया आघाडीच्या यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी 8 ते 10 बैठका होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निलंबित खासदारांसाठी आंदोलन
विरोधी पक्षातील 142 खासदारांना निलंबित करण्यात आल्याने इंडिया आघाडीने त्याविरोधात जोरदार आवाज उठवत हे लोकशाही विरोधी असल्याची टीका केली आहे. खासदारांना निलंबित करण्यात आल्याने 22 डिसेंबर रोजी त्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.
मोदी-शहांनी स्पष्टीकरण द्यावं
इंडिया आघाडीने संसदेतील घुसखोरीवरुन सरकारला अनेक सवाल उपस्थित करून या घुसखोरीविषयी आणि सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. त्याविरोधातही जोरदार आवाज उठवू असा इशाराही विरोधकांनी यावेळी दिला आहे.