एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन सूरतला गेले. त्यांच्यासोबत आमदार नितीन देशमुखही होते. सूरतला गेलेले नितीन देशमुख परत आले. त्यांच्या परतीचे किस्से बरेच चर्चिले गेले. त्याच आमदार नितीन देशमुखांनी आता सत्तांतराबद्दल महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय. पैशांच्या बळावर सत्तांतर झालं असून, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या करेन, असा इशाराच देशमुखांनी शिंदेंना दिलाय.
अकोल्यात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार नितीन देशमुखांनी त्यांच्याविरुद्ध सुरू झालेल्या लाच प्रकरणाचा उल्लेख करत सत्तांतराबद्दल आपल्याकडे व्हिडीओ असल्याचा इशारा दिला आहे.
दसरा मेळाव्याची एकनाथ शिंदेंची जागा फिक्स; उद्धव ठाकरेंची स्ट्रॅटेजी चुकली?
राज्यातील सत्तांतरांबद्दल नितीन देशमुख काय म्हणाले?
अकोल्यातल्या सभेत नितीन देशमुख म्हणाले, ‘पाच दिवसांपूर्वी माझ्यावर अँटी करप्शनची चौकशी लावलीये. अँटी करप्शनच्या एसपींनी सांगितलं की, तुमचं काही असेल, वर जाऊन भेटा. मला ईडीची चौकशी लावायला हवी. अँटी करप्शनची कशाला लावता. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगलं स्थळ येईल. माझी तुरूंगात जायची तयारी आहे’, असं नितीन देशमुख म्हणाले.
‘यांनी जर पुन्हा माझ्या विरोधात कारवाई केली, तर माझ्याकडे अनेक व्हिडीओ क्लिप्स आहेत. ते उघड करेन. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. सत्तांतर घडवलं त्यांच्या व्हिडीओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. पैशाने सत्तांतर झालं हे सिद्ध करेन. मी हे सिद्ध करू शकलो नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन’, असं धक्कादायक विधान नितीन देशमुखांनी केलाय.
Ramdas Kadam : ‘अरे आदित्य खरा गद्दार तू आहेस, काका म्हणून पाठीत खंजीर खुपसला’
‘ते माझ्यावर कारवाया करतायेत. महाराष्ट्रातील सत्तांतराचा मी प्रत्यक्ष साक्षीदार. 50 खोके एकदम ओके’चं षडयंत्र दीड वर्षांपासून सुरू होतं. पैसे घेऊन सत्तांतर घडवण्यात आलं. ज्यांनी येथे निष्ठावंतांचा आव आणला होता, तेच 20 तारखेला सुरत येथे शिंदे गटात गेलेत. सुरतला जाणं वेगळं आणि नेलं जाणं वेगळं. महाराष्ट्रातील शिवसेनेचे जे 40 गद्दार आमदार आहेत, त्याबद्दल मी माझ्या पत्रकार परिषदेनंतर काहीच बोललो नाही’, असंही नितीन देशमुखांनी म्हटलंय.