आम्ही कुणी नाही, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात-अब्दुल सत्तार

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय वक्तव्य केलं आहे वाचा सविस्तर बातमी
NCP's Amol Mitkari is in contact with us Says Maharashtra Agricultural Minister Abdul Sattar
NCP's Amol Mitkari is in contact with us Says Maharashtra Agricultural Minister Abdul Sattar

आम्ही कुणीही नाही तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य अमोल मिटकरींनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याबाबत आता अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे. अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत ते कधी इकडे येत आहेत त्यांनी सांगावं असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

NCP's Amol Mitkari is in contact with us Says Maharashtra Agricultural Minister Abdul Sattar
महिला, कमिशन, संपत्ती... : आमदार अमोल मिटकरींविरुद्ध गंभीर आरोपांची माळ

नेमकं काय म्हणाले आहेत अब्दुल सत्तार मिटकरींबाबत?

अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात असून ते कधी येता हे मिटकरींनी सांगावं असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. एवढंच नाही तर अमोल मिटकरींना चांगल्या डॉक्टरला दाखवायची गरज असून त्यानंतर मिटकरी मध्ये काय फॉल्ट आहे हे कळेल अस ही ते म्हणाले..ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना माध्यमांशी बोलत होते. आमचं सरकार हे सामान्यांचं सरकार आहे. हे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आत्महत्या रोखण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असल्याचं सत्तार यांनी स्पष्ट केलं. औरंगाबादमध्ये मंत्रिपदासाठी भाजप कोणताही डबलगेम करत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

NCP's Amol Mitkari is in contact with us Says Maharashtra Agricultural Minister Abdul Sattar
"२० लाखांसाठी २ लाख" : जयंत पाटलांसमोरच अमोल मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप

ऑगस्ट महिन्यात काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं. तसंच पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये डावललं जात असल्याने राष्ट्रवादीत यावं असंही म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अमोल मिटकरींवर टीका केली. अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीत काय सुरू आहे त्याकडे जरा लक्ष द्यावं असं म्हणत बावनकुळे यांनी टोला लगावला होता.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी येण्याच्या आवाहनावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की "अमोल मिटकरी यांची पंकजा मुंडे यांच्यावर बोलण्याएवढी उंची नाही. पंकजा मुंडे रक्तानं भाजपच्या कार्यकर्ता आहेत. त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्या राष्ट्रीय नेत्या असून, मध्य प्रदेशाच्या सहप्रभारी आहेत. त्या कधीच भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी स्वप्न पाहू नये. जयंत पाटील यांनीच अमोल मिटकरी यांना विचारणा करावी. तसेच मिटकरी यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे आणि त्यांच्या पक्षात काय घडणार आहे याकडे लक्ष द्यावं असा टोला बावनकुळेंनी लगावला होता. आता अब्दुल सत्तार यांनीही यावरून अमोल मिटकरींना उत्तर दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in