‘लग्नानंतर पुरुष रोज रात्री…’, नितीश कुमारांच्या वक्तव्यावरुन गोंधळ अन् संताप
बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी लोकसंख्या नियंत्रणावरुन भर विधानसभेत बेताल आणि अश्लील वक्तव्य केले. त्यांच्या त्या विधानावरुन मंत्र्यांपासून ते अगदी जनसामान्यापर्यंत त्यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला जात आहे. तर सोशल मीडियावरुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT

Nitish Kumar: बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावरुन केलेल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला आहे. त्यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला आयोगापासून (Commission for Women) सामान्य लोकांपर्यंत अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. नितीश कुमार यांच्या त्या वक्तव्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे की, त्यांनी देशातील तमाम महिलांची माफी मागावी. तर त्यांच्या त्याच वक्तव्यावरून सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
तर काही लोकांनी त्यांच्या त्या विधानाला अश्लील वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. विधानसभेतील एक नेता अशा प्रकारची कशी काय भाषा वापरु शकतो असा सवालही सोशल मीडियावरुन उपस्थित करण्यात आली आहे.
निर्लज्ज पातळीवरचं विधान
ध्रुव त्रिपाठी नावाच्या युजरने लिहिले, नितीश कुमार यांच्या त्या वक्तव्याबद्दल म्हटले आहे की, ‘लैंगिक शिक्षण समजावून सांगण्याचा इतरही अनेक मार्ग आहेत. त्यामुळे अशा प्रकारची ही भाषा नितीश कुमार यांनी शोभत नाही. कारण ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांना त्यावर भाषण करायचेच होते तर त्यांनी त्यांच्या सचिवांना विचारुनही ते चांगले भाषण करु शकले असते असते, मात्र तसं काही झालं नाही. कारण त्यांच्यासारख्या नेत्याकडून विधानसभेची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे पण तसं काही झालं नाही. त्यांनी केलेले विधान हे अत्यंत निर्लज्ज पातळीवरचं विधान होते अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
हे ही वाचा >> Kalyan: अल्पवयीन विवाहित मुलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमकं काय घडलं?
लज्जास्पद विधान
तर यती शर्माने लिहिले आहे की, ‘नितीश कुमार यांनी राजकारणाची प्रतिष्ठा नष्ट केली आहे. एवढे घाणेरडे आणि लज्जास्पद विधान अजून मी कोणत्याही मोठ्या नेत्याकडून ऐकले नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.