Rajya Sabha Election : बंटी पाटील मैदानात, धनंजय महाडिकांना देणार धक्का?; मुश्रीफ काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं माजी खासदार धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली आणि चर्चा सुरू झाली ती सतेज पाटलांची. धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर सतेज पाटील काय खेळी करणार याचीच चर्चा होती. मात्र ते फारसे समोर दिसले नाहीत. मात्र राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानाने सतेज पाटलांनी राज्यसभेची निवडणूक मनावर घेतलेली असल्याचं स्पष्ट झालंय.

कोल्हापूरचं राजकारण गेल्या काही वर्षांत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्याभोवतीच फिरत आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, गोकूळ दुध महासंघ ते अलिकडेच झालेली विधानसभेची पोटनिवडणूक अशा सर्वच छोट्या मोठ्या निवडणुकांत सतेज पाटलांनी वर्चस्व दाखवून दिलं.

बंटी पाटील मुन्ना महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार?, दोघांमधील संघर्ष कधी उफाळून आला?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे धनंजय महाडिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर सतेज पाटील यांची रणनीती काय असेल, अशी चर्चा सुरू झाली. धनंजय महाडिकांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून सतेज पाटील या प्रक्रियेत फारसे दिसले नाही. मात्र, सतेज पाटील या निवडणुकीत पडद्यामागे राहून काम करत असल्याचं समोर आलंय.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी एक विधान केलं. त्या विधानातून सतेज पाटलांची राज्यसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

ADVERTISEMENT

त्यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी सतेज पाटील यांनी घेतलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न त्यांनाच विचारा.”

ADVERTISEMENT

हसन मुश्रीफांच्या म्हणण्यानुसार सतेज पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजेच धनंजय महाडिकांना विजयापासून रोखण्यापासून सतेज पाटील पडद्यामागून खेळी करत आहेत.

राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

सतेज पाटील शिवसेनेला देणार बळ?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेनं त्यांचा पारंपरिक मतदारसंघ महाविकास आघाडीत असल्याने काँग्रेसला दिला होता. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत धुसफुस शांत करत काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यात काँग्रेसला मदत केली.

आता शिवसेनेनं कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाच उमेदवारी दिलीये. पण या लढतीकडे सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असंच बघितलं जात आहे.

“महाविकास आघाडीतील एकत्रित ताकद या निवडणुकीत यश संपादन करेल. भाजपने ही निवडणूक लादलीये. ही निवडणूक चांगल्या वातावरणात बिनविरोध करणं अपेक्षित होतं. राज्यसभेच्या निवडणुका मतांवर असतात आणि महाविकास आघाडीकडे मते आहेत. अशा परिस्थिती आघाडीने प्रयत्न केला होता. भाजपची मते बाजूला जातील अशी परिस्थिती आहे,” असं सतेज पाटील म्हणाले होते.

“भाजपच्या सगळ्या आमदारांचा हिशोब केला, तर पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे जवळपास ३० आमदार तिथे आहेत. त्यामुळे मला वाटतं की, भाजपने त्यांचे आमदार सांभाळले पाहिजेत,” असं म्हणत सतेज पाटलांनी भाजपलाच स्पष्ट इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता सतेज पाटील महाडिकांना रोखतात की, महाडिक बाजी मारतात हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT