‘…तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील’, संजय राऊतांचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नववर्षाच्या पहिल्याचं दिवशी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोठं विधान केलंय. संजय राऊतांनी गेल्या वर्षात गाजलेल्या काही घटनांचा उल्लेख करत भाष्य केलंय. राहुल गांधींचं (Rahul Gandhi) कौतुक करत 2024 मध्ये देशात सत्तांतर होईल, असंही राऊतांनी म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा वालकर (Shraddha Walker), तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) प्रकरणांशी लव्ह जिहादचा (Love Jihad) संबंध नसल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) अपेक्षा व्यक्त करताना शिंदेंच्या सरकारबद्दल भाकित केलंय.

संजय राऊत रोखठोक सदरात म्हणतात, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार पाडलं हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. शिवसेनाही फोडण्यात आली. सत्तेच्या गैरवापराचं हे उदाहरण. हे सर्व मावळत्या वर्षात घडलं. मावळत्या वर्षात महाराष्ट्रानं एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिलं. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडं ढकलत आहेत. 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल”, असं भाष्य संजय राऊतांनी केलं आहे.

‘लव्ह जिहाद’चा मुद्द्यावरून राजकारण?; श्रद्धा वालकर, तुनिषा शर्मा घटनांबद्दल संजय राऊत काय म्हणाले?

काही महिन्यांपूर्वी समोर आलेलं श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि डिसेंबरमध्ये घडलेलं तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावरूनही राजकारण तापलेलं आहे. या घटनांशी लव्ह जिहादचा संबंध जोडला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रथमच स्पष्ट भूमिका केलीये. “नव्या वर्षात तरी देशातील लोकशाही व स्वातंत्र्याची कवचकुंडले मजबूत होवोत. कारण संकुचित मानसिकतेची सर्व लक्षणे सध्याच्या राज्यकर्त्यांत दिसत आहेत. सर्वत्र जात, धर्म आणि त्यावरून तणाव हे चित्र परवडणारे नाही. हिंदू आणि मुसलमानांत कायमचे वैर हे देशाला नव्या फाळणीकडे ढकलत आहे. जगात कोणीच अमर नाही हे लक्षात घेतले तर मोदी व शहांनी देशात द्वेषाची आणि फाळणीची बीजे रोवू नयेत”, अशी टीका संजय राऊतांनी केलीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिंदे गटात पहिली ठिणगी! अब्दुल सत्तारांनी शिंदे-फडणवीसांकडे केली तक्रार

“राममंदिराचा प्रश्न निकाली निघाला, त्यावर आता मतं मिळणार नाहीत. तेव्हा ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर मोर्चे व आंदोलनं सुरू केली गेली. कोणत्याही जातीधर्मातील स्त्रीवर अत्याचार होऊ नयेत. श्रद्धा वालकर या मुलीची हत्या करणारा मुसलमान तरुण होता. श्रद्धाच्या आई-वडिलांनी आफताबबरोबर संबंध ठेवण्यास विरोध केला होता व आपली मुलगी सोडून गेली या धक्क्याने तिच्या आईचं निधन झालं. मुंबईतील एक सिनेकलाकार तुनिषा शर्मा हिने प्रेमभंग झाल्याने सेटवरच आत्महत्या केली. तिचाही प्रियकर मुसलमान हे खरे, पण सर्वच जातीधर्मातील स्त्रियांवर सतत अत्याचार होत आहेत हे विसरता येणार नाही व हा काही ‘लव्ह जिहाद’चा प्रकार नाही. महाराष्ट्रात या काळात ‘लव्ह जिहाद’विरोधात मोठे मोर्चे काढण्यात आले. मुळात ‘लव्ह जिहाद’ची व्याख्या ठरवायला हवी. उद्याच्या निवडणुका जिंकण्यासाठी व हिंदू मतदारांमध्ये भय निर्माण करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’चे हत्यार कोणी वापरत आहे काय?”, असं म्हणत संजय राऊतांनी लव्ह जिहादच्या मुद्द्याचं फायद्यासाठी राजकारण केलं जात असल्याचा दावा केलाय.

ADVERTISEMENT

अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी

ADVERTISEMENT

संजय राऊतांकडून राहुल गांधींचं कौतुक

“राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा’ घेऊन कन्याकुमारीतून निघाले. ते मावळत्या वर्षात दिल्लीत थडकले. सुमारे 2800 किलोमीटर प्रवास करून हा नेता दिल्लीत पोहोचला तेव्हाही त्याच्याबरोबर हजारो पदयात्री चालत होते व ही यात्रा बंद कशी पाडता येईल यासाठी पडद्यामागे दिल्लीतच कारस्थाने सुरू होती. मावळत्या वर्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वास नवे तेज आणि वलय निर्माण करून दिले. राहुल गांधींचे नवे रूप मावळत्या वर्षाने दिले. ते 2023 मध्ये तसेच राहिले तर 2024 मध्ये देशात राजकीय परिवर्तन झालेले पाहता येईल”, असं म्हणत राहुल गांधींमुळे देशात सत्तांतर होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT