Mumbai Tak /बातम्या / Padma: ‘बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे..’, BJPवर बोचरी टीका
बातम्या राजकीय आखाडा

Padma: ‘बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे..’, BJPवर बोचरी टीका

Shiv sena (UBT) criticized to BJP on Padma Awards: मुंबई: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards) नुकतीच घोषणा झाली. पण आता याच पुरस्कारावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv sena UBT) पक्षाने भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो पण बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि वीर सावरकरांचा मात्र मोदी सरकारला (Modi Govt) विसर पडतो. अशी टीका शिवसेनेने आपलं मुखपत्र असेलल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Editorial) केली आहे. (shiv sena ubt once again criticized bjp on padma awards from saamana editorial balasaheb thackeray)

‘बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र विधानसभेत लावले त्याचा काय मोठा गाजावाजा केला! पण याच सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते. पण मुलायमसिंग यादवांचा गौरव करणारे मोदी शासन वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राटांना मात्र विसरून गेले. लोकांनी या घटनेचे स्मरण ठेवायला हवे.’ अशी टीका करत शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले आहेत.

पद्म पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य आणि संध्या मुखर्जी आहेत तरी कोण?

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंडळींना ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यातील बरीच नावे ही ‘संघ’ परिवाराशी संबंधित आहेत व त्याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदी यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणतात, ‘पद्म पुरस्काराने गौरविण्यात आलेल्यांचे देशासाठी योगदान आणि प्रयत्न यामुळे भारत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.’ आता पंतप्रधान मोदी म्हणतात म्हणजे ते खरेच असणार. झाकीर हुसेन, सुमन कल्याणपूर, भैरप्पा, सुधा मूर्ती, कुमारमंगलम् बिर्ला अशांचा गौरव झाला तो योग्यच आहे.

  • दिवंगत मुलायमसिंग यादव यांनाही पद्मविभूषण सन्मान देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली हे महत्त्वाचे.

  • अयोध्येत आता राममंदिर उभे राहात आहे व त्याच राममंदिराच्या नावावर प्रत्येक निवडणुकीत मते मागितली गेली, पण 1990 साली झालेल्या अयोध्या आंदोलनात त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंग यादव यांनी करसेवकांवर निर्घृणपणे गोळय़ा चालवल्या. त्यात शंभरांवर साधू-संत, करसेवक मारले गेले व अनेकांची प्रेते तर शरयू नदीत फेकण्यात आली. करसेवकांच्या रक्ताने तेव्हा शरयू लाल झाली. त्या हत्याकांडानंतर भाजप व संघपरिवार मुलायमसिंग यांचा उल्लेख ‘मौलाना मुलायम’ असा करू लागले.

प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराचे मानकरी कोण-कोण

  • त्या हत्याकांडानंतर भाजप व संघपरिवार मुलायमसिंग यांचा उल्लेख ‘मौलाना मुलायम’ असा करू लागले. त्यानंतर मुलायम यांनी असेही सांगितले की, ‘बाबरी मशीद वाचविण्यासाठी आणखी हिंदूंना गोळय़ा घालाव्या लागल्या असत्या तरी मागे-पुढे पाहिले नसते.’ मुलायम यांच्या अशा वक्तव्यानंतर भाजप व त्यांच्या परिवाराने मुलायमसिंग यांच्यावर हिंदूंच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण त्याच मुलायम यांना आता प्रखर हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारने ‘पद्म विभूषण’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला.

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो.

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…