आदित्य ठाकरे वाचणार आता लालू प्रसाद यादवांचे राजकारण; बिहारमध्ये मिळाली दोन पुस्तकं भेट

आदित्य ठाकरे हे पहिले असे ठाकरे आहेत ज्यांनी बिहारचा दौरा केला
Aditya Thackeray-Tejashwi Yadav Meeting
Aditya Thackeray-Tejashwi Yadav MeetingMumbai Tak

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या मुशीत तयार झालेले, पक्षाने परप्रांतीयांविरोधात विषेशतः 'हटाव लुंगी-बजाव पुंगी', 'लालू लल्ला, मुलायम मुल्ला' असं म्हणतं दक्षिण आणि उत्तर भारतीयांविरोधात केलेली आंदोलन पाहून राजकारणात आलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे हे आता माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारच्या राजकारणातील अग्रगण्य नाव असलेल्या लालू प्रसाद यादव यांचं राजकारण वाचणार आहेत.

आज आदित्य ठाकरे यांनी लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांना लालू प्रसाद यादव यांच्या राजकारणाशी संबंधित 'गोपालगंज से रायसीना' आणि 'सदन में लालू प्रसाद, प्रतिनिधी भाषण' ही पुस्तक भेट दिली. तर आदित्य ठाकरे यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा छोटा अर्धाकृती पुतळा भेट दिला.

बिहार दौरा करणारे आदित्य ठाकरे पहिलेच

आदित्य ठाकरे हे पहिले असे ठाकरे आहेत ज्यांनी बिहारचा दौरा केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीत काय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या दोघांची भेट झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?

आज मी तेजस्वी यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. आमचे कौटुंबिक संबंध खूप सलोख्याचे आहेत. आमच्या भेटीमध्ये कुठलंही राजकारण आणू नका. आम्ही एकमेकांशी राजकारण सोडून चर्चा केली. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. मी तेजस्वी यादव यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

तर त्यांनीही मला पुढच्या वेळी इथे दोन ते तीन दिवसांसाठी येण्याचं आमंत्रण दिलं आहे. इथलं फॉरेस्ट असेल किंवा पर्यटनाची इतर ठिकाणं असतील तिथे ते मला घेऊन जाणार आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. आजची आमची चर्चा राजकारणावर नव्हती असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. तसंच या भेटी-गाठी यापुढेही होत राहतील असंही स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in