ठाण्यातील राडा वाढणार? हल्ला झालेल्या रोशनी शिंदेंवरच गुन्हा दाखल, काय आहे कारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) Party chief Uddhav Thackeray, Roshni Shinde
Shiv Sena (UBT) Party chief Uddhav Thackeray, Roshni Shinde
social share
google news

Roshani Shinde Attack :

ADVERTISEMENT

शिवसेना (UBT) पक्षाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांच्याविरोधात ठाण्यातील कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दत्ताराम गवस यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारतीय दंड विधान 153 (A)(1), 499, 500 या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून होत असतानाच रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता ठाण्यातील शिंदे विरुद्ध ठाकरे गटातील राडा वाढणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे. (A case has been registered against Shiv Sena (UBT) Party activist Roshni Shinde at Kasarwadvali Police Station in Thane)

ठाण्यात काल पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आला. या वादात शिवसेना (UBT) पक्षाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काही महिलांनी कासावडवली येथे मारहाण केली. एका फेसबूक पोस्टवरील कमेंटमुळे हा हल्ला शिवसेना (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा दावा रोशनी शिंदे यांनी केला आहे. सोमवारी सायंकाळी या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटनेची चर्चा सुरू झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिलांचा एक गट रोशनी शिंदे यांना घेरून वाद घालताना दिसत आहे. त्यानंतर त्यांना कार्यालयात घेऊन जाताना दिसत आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Thane : ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाकडून मारहाण; वादाचं कारण आलं समोर

उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट :

हल्ल्यानंतर रोशनी शिंदे यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून आज (मंगळवारी) शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी दीपक शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तालय गाठलं. यानंतर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

या पत्रकार परिषदेदरम्यान, यावेळी ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं. ते म्हणाले, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारला नपुंसक म्हटल्याचं ऐकलं. त्याची प्रचिती काल आली आहे. ठाण्याची ओळख कालपर्यंत जीवाला जीव देणार, सुसंस्कृत आणि सुशिक्षीत शहर म्हणून होती. पण आता ही ओळख पुसून गुंडांचं ठाणं अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Uddhav Thackeray ठाण्यात; थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली शिवसेनेच्या वाघिणीची भेट

आज पर्यंत मी गँग हा शब्द ऐकत होतो. पण आता महिलांची गँग तयार झाली आहे. महिला गुंडगिरी करायला लागल्या तर आपल्या देशाचं, राज्याचं, ठाण्यचं काय होणार हा प्रश्न आहे. हो गुंड महिलाच म्हणतो मी आणि महिला गुंडांकरवी हल्ला करणारे नपुंसकच म्हटले पाहिजे. जर शिवसैनिक रस्त्यावर उतरला तर आता म्हटलं तर आम्ही यांची गुंडगिरी ठाण्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून फेकून देऊ शकतो. हे तोतये शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचत आहेत, त्यांना हातामध्ये भगवा आणि बाळासाहेबांचा फोटो घेण्याचा अधिकार नाही.

ADVERTISEMENT

आता आयुक्तांच्या कार्यालयात गेलो पण ते तिथे उपस्थित नव्हते. ते सरकारचा भाग म्हणून त्याचाप्रमाणे आयुक्त वागत आहेत की काय याची मला कल्पना नाही. पण अजूनही तक्रार दाखल करुन घेतलेली नाही. तिने नाव दिलेली आहेत. ती सांगत होती पोटात मारु नका, लांबून बोला, मातृत्वासाठीचे उपचार सुरु आहेत. पण तरीही तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. हे अत्यंत निघृण काम करणारी माणसं महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत.

फडतूस गृहमंत्री अन् लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री :

एक फडतूस गृहमंत्री, अत्यंत लाचार आणि लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. पद मिळालं म्हणून फडणवीसी करणारा माणूस उपमुख्यमंत्री म्हणून मिरवतं आहे. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरी ते कुठेही हालायला तयार नाहीत. मला असं वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी लावायची. शेजारच्या राज्यातून अटक करायची. त्यांच्या पक्षातील लोकांवर हल्ले झाले तर मिंधे गटाकडून झाले तर तिकडे ही फडणवीसी दाखवण्याची हिंमत नाही.

हेही वाचा : ‘Devendra Fadnavis फडतूस गृहमंत्री’ : उद्धव ठाकरेंचा चढला पारा; थेट राजीनाम्याची मागणी

ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. बिनकामाचा आयुक्तांनाही मला सांगायचं आहे की पदभार स्विकारताना तुम्ही जी शपथ घेतली त्याच्याशी ही प्रतारणा आहे. त्यांना हटवावं आणि एक कणखर आयुक्त ठाण्यात द्यावे. जर गृहमंत्री खरंच लाळघोटेपणा करत नसतील तर, जराही लाज, लज्जा शरम असेल, हिंमत असेल तर ताबडतोब एक तर पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा, अशी मागणी त्यांनी केली.

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात उद्या ठाण्यात मोर्चा :

दरम्यान, रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांची ही कृती पक्षपातीपणाची असल्याचा आरोप करत उद्या (बुधवारी) शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT