शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 11 आमदार होणार मंत्री, दोन दिग्गजांना डच्चू?
Shiv sena Minister list: राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी शिवसेनेने आपल्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे. यावेळी नवीन चेहऱ्यांना स्थान मिळताना दिसत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिवसेनेच्या कोट्यातील 11 आमदार मंत्री होऊ शकतात
सरकार स्थापनेनंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया सुरू
शिवसेनेच्या दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो
मुंबई: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले असून त्यात महायुतीचे दोन पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हेही समाविष्ट आहेत. ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. सरकार स्थापनेनंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. ताजी बातमी अशी आहे की, यावेळी शिवसेनेच्या कोट्यातील 11 आमदार मंत्री होऊ शकतात.
राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी शिवसेनेने आपल्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे. यावेळी दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
हे ही वाचा>> Viral News: 16 लाखांची 'ही' सर्जरी करून मॉडेल होणार पुन्हा VIRGIN! आहे तरी कोण?
'या' दोन मंत्र्यांचे पत्ते होणार कट?
माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांची मागील कामगिरी आणि आरोप लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. शिवसेनेकडून ५ नवीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.]
हे ही वाचा>> India Alliance : उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व द्यावं, बड्या नेत्याचा राहुल गांधींवर अविश्वास?
शिवसेनेचे मंत्रिपदाचे दावेदार भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. महायुतीत शिवसेनेला 13 ते 14 मंत्रिपदे मिळतील, असे मानले जात आहे. त्यापैकी 10 ते 12 मंत्री या आठवड्यात शपथ घेणार आहेत.










