Rohit Pawar : "आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं किंवा एखाद्या पक्षाला B-team म्हणणं...", रोहित पवार यांचा कुणाला सल्ला?

मुंबई तक

एकीकडे आधी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर होता. तर त्यानंतर सपाने वेगळं होण्याची भूमिका घेतली. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी अबू आझमी यांच्यावर टीका केली होती. या वादात आता रोहित पवारांनी उडी घेतली असून, त्यांनी मात्र दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरुन अंतर्गत कलह पाहायला मिळाले होते. एकीकडे आधी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर होता. तर त्यानंतर सपाने वेगळं होण्याची भूमिका घेतली. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी अबू आझमी यांच्यावर टीका केली होती. त्यानतंर आता या वादात आता रोहित पवार यांनीही उडी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. 

 

हे ही वाचा >> Balwant Wankhede : काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे राजीनामा देणार? राणांचं आव्हान स्वीकारत काय म्हणाले?
 

गेल्या 6 डिसेंबररोजी उद्धव ठाकरेंचे नीकटवर्तीय आणि पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मशि‍दीशी संबंधीत एक पोस्ट केली होती. त्यानंतर तडकाफडकी भूमिका घेत अबू आझमी यांनी आपल्या दुखावल्याचं सांगत, महाविकास आघाडीतून वेगळं होण्याची भूमिका घेतली होती. त्यावरुन काल माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अबू आझमी यांच्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही. पण अखिलेश यादव त्यांची लढाई लढत आहेत आणि राज्यातले सपाचे नेते कधी कधी भाजपच्या बी टीमसारखी वागतात... आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे... आमचं हिंदुत्व 'हृदय में राम और हाथ को काम' आहे... आमचे हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंना सल्ला दिल्याचं पाहायला मिळालं आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp