Maratha Morcha: ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये लाज उरली…’,आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका
राज्यपालांसोबतच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी हा लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच पोलीस कधीही विचारल्याशिवाय लाठीचार्ज करत नाही.
ADVERTISEMENT
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचे जालन्यात उपोषण सुरु आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. या नवव्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असून त्यांना सलाईनवर ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात आज ठाकरे गटाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. (aditya thackeray criticize eknath shinde maratha reservation maharashtra politics)
ADVERTISEMENT
ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे गटाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं व मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्याचे निवेदन राज्यपाल रमैश बैस यांना दिले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर यासह अनेक नेते उपस्थित होते.
हे ही वाचा : Rohit Pawar : ‘अजूनही वेळ गेलेली नाही…’ रोहित पवारांचा नेमका इशारा कुणाला
राज्यपालांसोबतच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी हा लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच पोलीस कधीही विचारल्याशिवाय लाठीचार्ज करत नाही. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांकडून लाठीचार्जचे आदेश घेतले जातात. पण सरकारने हे आदेश आम्ही दिले नसल्याचे म्हटले आहे.
हे वाचलं का?
जालन्यात लाठीचार्जचे ज्यांनी आदेश दिले, घटनाबाह्य, गद्दार, मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री यांच्यातला खरा जनरल डायर कोण? हे जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्ह्टले आहे. या प्रकरणात चौकशी बसवली जाणार, जशी खारघरमध्ये बसवली होती. त्याच्यावर अजून काही कारवाई झाली नाही, रिपोर्ट आला नाही. एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याला दोषी धरल जाईल, निलंबित केलं जाईल. पण ज्यांना काही आदेश दिले आहेत त्यांना कुठेही काहीही होणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितते. त्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी थोडी लाज उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
हे ही वाचा : Maratha Reservation : सरकारने काढला तोडगा; कुणबी जातप्रमाणपत्र काढण्यासाठी काय लागणार?
महाविकास आघाडीच्या आमदारांना अजुन एक रूपया सुद्धा मिळाला नाही आहे. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टूपूक टूपूक गेल्यावर निधी मिळतो, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला. तसेच देशाचे नाव इंडियावरून भारत करण्यात येणार असल्याची चर्चा सूरू आहे. हा भारत जोडो आणि इंडिया आघाडीचा इम्पॅक्ट असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच ज्या मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाला त्या भारतवासीच आहेत. ज्यांच्यावर पर्वा लाठीचार्ज झाला,डोकी फो़डली गेली तेही भारतीवासीच आहेत, जे जी20 साठी पडद्यामागे लपवले गेले आहेत, ते देखील भारतवासीचं आहे. त्यामुळे नुसतं नाव बदलून चालणार नाही, कामाबद्दल चर्चा झाली पाहिजे, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT