Barsu: ‘उद्धव ठाकरे, राऊत हे चपट्या पायाचे लोक…’, राणे बंधूंची जहरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp mla nitesh rane criticized uddhav thackeray who came to barsu
bjp mla nitesh rane criticized uddhav thackeray who came to barsu
social share
google news

रत्नागिरी: बारसू रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्पावरुन ठाकरे आणि राणे हे पुन्हा आमनेसामने आले आहेत. शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट बारसूत जाऊन प्रकल्पाला विरोध असणाऱ्या स्थानिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह (BJP) राणेंवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि त्यांचे बंधू निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. (bjp mla nitesh rane criticized uddhav thackeray who came to barsu)

‘कोकणाला लागलेला शाप कोण असेल तर तो उद्धव ठाकरे आहे, त्याचं नाव विनायक राऊत आहे.. ही चपट्या पायाची लोकं आपल्या कोकणात येतात.. कुठलाही प्रकल्प झाला तर सौदेबाजी करतात, खोके घेतात आणि त्या प्रकल्पाला बंद पाडण्याचा प्रयत्न करतात.’ अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे हे रिफायनरी विरोधकांची भेट घेत असताना दुसरीकडे निलेश आणि नितेश राणेंनी मात्र रिफायनरी समर्थकांची रॅली काढली. याचवेळी केलेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सर्वात मोठा दलाल’, नितेश राणेंची टीका

‘कोण तरी एक पर्यटक मुंबईवरुन आलेला आहे. बारसू गावात त्याचं हेलिकॉप्टर काही उतरू दिलं नाही. म्हणून जैतापूरमध्ये कुठे तरी उभं केलं आहे. आणि बारसू गावात काही लोकांशी बोलून पेटवापेटवीचं काम करून ते परत मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मी तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ओळख द्यायची झाली तर महाराष्ट्रात सर्वात मोठा दलाल कोण असेल तर तो तुमच्या रत्नागिरी बारसूमध्ये आज आलेला आहे.’

‘आम्ही सातत्याने विचारतोय की, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा व्यवसाय काय.. कुठला धंदा करतात, व्यवसाय करतात की, ते हेलिकॉप्टरने फिरतायेत?’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> NCP: “शरद पवारांनी अजित पवारांना मामा बनवलं”, निखील वागळेंचं स्फोटक विश्लेषण

‘मला उद्धवजींना विचारायचं आहे.. जेव्हा महापालिकेचे टेंडर घ्यायचे असतात तेव्हा गुजराती चालतात.. बाहेरगावी जायचं असेल.. मुला-बाळांसाठी कपडे घ्यायचे असतील तेव्हा गुजराती चालतात.. पण आता जेव्हा आमचा कोकणाचा विकास होतोय तर त्यांना विरोध सुचतोय.. म्हणून अशा प्रकारचा दलाल आपल्या कोकणात येऊन द्यायचा का? याबाबत कोकणातील जनतेने खरंच विचार करायला पाहिजे.’

ADVERTISEMENT

‘मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की.. कोकणाला लागलेला शाप कोण असेल तर तो उद्धव ठाकरे आहे, त्याचं नाव विनायक राऊत आहे.. ही चपट्या पायाची लोकं आपल्या कोकणात येतात.. कुठलाही प्रकल्प झाला तर सौदेबाजी करतात, खोके घेतात आणि त्या प्रकल्पाला बंद पाडण्याचा प्रयत्न करतात.’ अशी टीका करत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हे ही वाचा >> Sharad Pawar: कात्रजचा घाट, तेल लावलेला पैलवान.. ‘पॉवर’फुल पवारांचे प्रचंड इंटरेस्टिंग किस्से!

‘उद्धव ठाकरे काय पेटवणार?’

‘बारसू प्रकल्प हा भाजपने आणला नाही तर ती जागा उद्धव ठाकरेने पत्र देत सुचवली होती. तोच माणूस येऊन आज आंदोलन करतोय. इथे लोकांना पेटवायला आला आहे. उद्धव ठाकरेकडे बघून तो वाटतोय काय पेटवणारा.. आहे का तुझ्याकडे माचिस पेटवायला.. तुझं सगळं विझलंय.. तू काय पेटवणार..’ अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनीही यावेळी टीका केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT