PM Modi Speech Live: 'Pak विरोधात भारताने हल्ला फक्त स्थगित केलाय, पण यापुढे...', PM मोदींचं मोठं विधान
Operation Sindoor| Indo Pak war: भारत-पाकमधील तणावाच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (12 मे) देशवासियांना संबोधित करत आहे. पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (12 मे) देशावासियांना संबोधित केलं. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलं. पण 10 मे रोजी अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकांनी अशा पद्धतीने झालेली घोषणा यावरून टीका केली होती. तसंच या सगळ्याबाबत पंतप्रधान मोदींनी नेमकी काय बाजू आहे ती मांडावी अशी मागणी केली होती. अखेर शस्त्रसंधी कराराच्या दोन दिवसानंतर आज पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित करताना पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. ऑपरेशन सिंदूर नंतर हे त्यांचे पहिलेच भाषण होते ज्यात त्यांनी भारतीय सैन्याच्या दहशतवादाविरुद्धच्या कारवाईतील यशाची नोंद केली आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला की दहशतवादाविरुद्ध भारताची कारवाई सुरूच राहील.
'आम्ही सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले'
पंतप्रधान मोदी म्हणाले, '22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी दाखवलेल्या क्रूरतेने देश आणि जगाला धक्का बसला होता. सुट्टी साजरी करणाऱ्या निष्पाप, निरुपद्रवी नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर क्रूरपणे मारण्यात आले. हा दहशतवादाचा एक अतिशय भयानक चेहरा होता. हा देशाचा सलोखा तोडण्याचा प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या हे खूप मोठे दुःख होते.'
'भारताची कारवाई फक्त स्थगित करण्यात आली आहे, जर यापुढे...'
पंतप्रधान पुढे म्हणाले, 'म्हणून, जेव्हा पाकिस्तानकडून असे सांगण्यात आले की, त्यांच्याकडून यापुढे कोणत्याही दहशतवादी कारवाया आणि लष्करी कारवाया केल्या जाणार नाही. म्हणून भारतानेही ती गोष्ट विचारात घेतली. आणि मी पुन्हा सांगतो, आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्करी आस्थापनांविरुद्धची आमची प्रत्युत्तरात्मक कारवाई फक्त स्थगित केली आहे. पण येत्या काळात, आम्ही पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीचे मोजमाप करू.' असं म्हणत मोदींनी नेमक्या शब्दात इशारा दिला आहे.
पंतप्रधान मोदींचं भाषण LIVE
हे ही वाचा>> युद्धामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, शेअर बाजारावर दुष्काळ, तब्बल...
'पाकिस्तानने गोळ्या झाडल्या तर तुम्ही तोफगोळे सोडा...' PM मोदींचे लष्कराला आदेश
पंतप्रधान मोदींनी रविवारी (11 मे) सशस्त्र दलांना निर्देश दिले होते की, पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कृतीला भारताचा प्रतिसाद मोठा आणि जोरदार असावा. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांना सांगितले की, जर सीमेपलीकडून गोळ्या झाडल्या गेल्या तर भारताने तोफगोळे डागून प्रत्युत्तर द्यावे.
हे ही वाचा>>"पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती
PM मोदींच्या सतत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठका
भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (DGMO) यांच्यात नियोजित चर्चेपूर्वी, पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठक झाली.
एनएसए अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही लष्करप्रमुख बैठकीला उपस्थित होते. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताच्या राजनैतिक आणि लष्करी प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ सरकारी आणि संरक्षण अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेत आहेत. या सगळ्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे आज देशवासियांना संबोधित करणार आहेत.