सिंदूरनंतर आता ऑपरेशन 'केल्लर', भारतीय सैन्याचं सर्च ऑपरेशन, दिसताक्षणी 3 दहशतवादी ठार
भारत सरकारने स्पष्ट केलंय की, भविष्यात भारताच्या भूमीवर होणारा कोणताही "दहशतवादी हल्ला" हा "युद्ध" म्हणून पाहिलं जाईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याचं ऑपरेशन 'केलर'

भारतीय सैन्याची जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई
Operation Keller in Jammu Kashmir Shopian : सिमेपलीकडे केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांवर नेम धरला आहे. आज (13 मे 2025) शोपियान जिल्ह्यातील केलर भागात भारतीय लष्करानं सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रीय रायफल्स युनिटला दहशतवादी असलेल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर शोध सुरू केला होता. इंडियन आर्मीने या ऑपरेशनला ऑपरेशन केल्लर असं नाव दिलंय.
हे ही वाचा >> जिथं पाकिस्ताननं हल्ला केल्याचा दावा केला, तिथंच PM मोदी पोहोचले... जवानांसोबत काय घोषणा दिल्या?
तीन दहशतवादी ठार
भारतीय सैन्याने दिलेल्या अधिकृत सांगितलं, "13 मे 2025 रोजी शोपियानच्या शोएकल केलर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्करानं शोध मोहीम सुरू केली." या मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला, त्यानंतर झालेल्या तीव्र चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ऑपरेशन अद्याप सुरू आहे, असं लष्करानं स्पष्ट केलं.
दरम्यान, भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या करारानंतर काही दिवसांनी घडला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भागांवर ड्रोन हल्ले केले, जे भारतीय संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. मात्र, यामुळे दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये मोठ्या संघर्षाची भीती निर्माण झाली होती.
हे ही वाचा >>PM Modi: 'अण्वस्त्र ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, आम्ही अचूक...', मोदींचं सर्वात मोठं विधान, पाकला उघडउघड इशारा!
मात्र, युद्धबंदीच्या घोषणेनंतर काही तासांतच पाकिस्तानने श्रीनगर आणि अन्य सीमावर्ती भागात युद्धबंदीचा भंग केल्याचं दिसून आलं. दरम्यान, भारत सरकारने स्पष्ट केलंय की, भविष्यात भारताच्या भूमीवर होणारा कोणताही "दहशतवादी हल्ला" हा "युद्ध" म्हणून पाहिलं जाईल. अशा हल्ल्यांना त्याला त्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाईल.