PM Modi: 'अण्वस्त्र ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, आम्ही अचूक...', मोदींचं सर्वात मोठं विधान, पाकला उघडउघड इशारा!
'कोणतंही अण्वस्त्र ब्लॅकमेलिंग (Nuclear Blackmailing) भारत सहन करणार नाही.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (12 मे) पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केलं. ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट आणि उघडउघड इशारा दिला आहे. 'कोणतंही अण्वस्त्र ब्लॅकमेलिंग (Nuclear Blackmailing) भारत सहन करणार नाही.' असं म्हणत मोदींनी भारत सर्व प्रकारच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असल्याचं यावेळी म्हटलं.
पाहा पंतप्रधान मोदी अण्वस्त्र ब्लॅकमेलिंगबाबत नेमकं काय म्हणाले
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आम्ही पाकिस्तानचं प्रत्येक पाऊल या कसोटीवर पाहू की ते काय भूमिका घेतात. भारताच्या तीन सेना.. आमचं हवाई दल, नौदल, लष्कर आणि BSF तसंच भारताचं अर्धसैनिक बल हे देखील सातत्याने अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाबाबतची भारताची निती आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधात लढाईत एक नवी रेखा आखली आहे.'
हे ही वाचा>> PM Modi Speech: 'पानी और खून एकसाथ नहीं बह सकते..' PM मोदींचं घणाघाती भाषण जसंच्या तसं...
'भारतावर जर दहशतवादी हल्ला झाला तर ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या अटींवर उत्तर देऊ. त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही कठोर कारवाई करू जिथून दहशतवादाची मुळं फोफावतात.'
दुसरा मुद्दा.. कोणतंही अण्वस्त्र ब्लॅकमेलिंग (Nuclear Blackmailing) भारत सहन करणार नाही. अण्वस्त्राच्या ब्लॅकमेलिंगच्या आड पोसल्या जाणाऱ्या दहशतवादी ठिकाणांवर भारत अचूक आणि निर्णायक प्रहार करेल.
'तिसरा मुद्दा.. आम्ही दहशतवाद पुरस्कृत सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जगाने पाकिस्तानचं घाणरेडं कृत्य पाहिलं आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे मोठमोठे अधिकाऱ्यांनी रिघ लावली होती. हा सरकार पुरस्कृत दहशतवादाचा मोठा पुरावा आहे.आम्ही भारत आणि आपल्या नागरिकांना कोणत्याही धोक्यांपासून वाचविण्यासाठी सतत निर्णायक पावलं उचलत राहू.'
हे ही वाचा>> PM Modi Speech Live: 'Pak विरोधात भारताने हल्ला फक्त स्थगित केलाय, पण यापुढे...', PM मोदींचं मोठं विधान
'युद्धाच्या मैदानात आम्ही प्रत्येक वेळी पाकिस्तानला धूळ चारली आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने नवं आयाम जोडलं आहे. आम्ही वाळवंट आणि डोंगरदऱ्यांमध्ये आपल्या क्षमतेचं शानदार प्रदर्शन केलं आहे. या ऑपरेशनदरम्यान, आमच्या मेड इन इंडिया शस्त्रांची प्रामाणिकता सिद्ध झाली आहे.'
असं म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला थेट आणि उघडउघड इशारा दिला आहे. मोदींनी हे देखील स्पष्ट केलं आहे की, ऑपरेशन सिंदूर हे केवळ स्थगित करण्यात आलं आहे. जर पाकिस्तानने काही आगळीक केली तर त्याला चोख प्रत्युत्तर त्याच शब्दात दिलं जाईल.