‘नितेश राणेंनी कार्टून बघावं’ ठाकरेंच्या नेत्याने उडवली खिल्ली

मुंबई तक

ADVERTISEMENT

nitesh rane criticizes aditya thackeray, opposition leader Ambadas Danve criticizes nitesh rane for watching cartoons
nitesh rane criticizes aditya thackeray, opposition leader Ambadas Danve criticizes nitesh rane for watching cartoons
social share
google news

Ambadas Danave: केंद्र व राज्य सरकार (Central and State Government) सत्ताधाऱ्यांचं बटिक झालं आहे. केंद्राच्या घरगड्यासारखं ते काम करीत आहे. ज्यांची वैचारिक दिशा भाजपच्या (BJP) विरोधात असते त्यांचाच छळ केला जातो. त्यानंतर ती व्यक्ती स्वतःकडे घेतली जाते या प्रकारचे दृष्टचक्र सध्या राज्यात सुरु आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग केला जातो आहे अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केली आहे.(criticizes aditya thackeray, opposition leader Ambadas Danve criticizes nitesh rane for watching cartoons)

ADVERTISEMENT

जनतेत रोष

दौंडचे आमदार व दादा भुसे यांच्या विरोधात तक्रार केली आहे का कारवाई होत नाही असा सवाल उपस्थित केल्यानंतर मात्र त्यांनी सांगितल की, जेवढी कारवाई कराल तेवढी जनतेत रोष निर्माण होणार असल्याची मतही त्यांनी मांडले.

हे ही वाचा >>‘त्या’ प्रकरणावर अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “मी आणि छगन भुजबळ…”

…तेवढचं बोलावं

अंबादास दानवे यांनी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर मत व्यक्त करताना दानवेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. नितेश राणेंची क्षमता आहे का? जेवढा पगार आहे तेवढचं बोलावं. किंवा त्यांनी कार्टून बघावं अशा शब्दात त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, मला नितेश राणेंवरदेखीस खालच्या पातळीवरची भाषा बोलता येते मात्र मी बोलणार नाही असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

हे वाचलं का?

लवकर निकाल द्या

अंबादास दानवे यांनी अपात्र आमदारांच्या विषयावर बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली आहे. राहुल नार्वेकर मोठे बॅरिस्टर लागून गेले आहेत का, असा सवाल करत त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला अपात्र करा असं म्हटलेले नाही तर आम्हाला लवकर निकाल द्या असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. अपात्रतेचा निर्णय दबावाखाली घेणार नाही असे ते म्हणतात मात्र याचा दुसरा अर्थ पात्रतेचा निर्णय दबावाखाली घेणार आहेत असा होतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

नार्वेकरांवर टीका

यावेळी त्यांनी नार्वेकरांवर टीका करताना म्हटले की, तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी कुणाकुणाला भेटला, कुठे-कुठे गेला, कोणत्या मंत्र्याला भेटले याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “काळजी करण्याची…”

थोड्या वेळासाठी झाकतो

आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलतान ते म्हणाले की, सूर्यालादेखील आदित्य म्हणतात. तो सुद्धा कोणी झाकू शकत नाही आणि या आदित्यलादेखील कोणी झाकू शकत नाही. ढग आले तर थोड्या वेळासाठी झाकतो मात्र पुन्हा तो तेजाने तळपतो अशा शब्दातही त्यांनी आदित्य ठाकर यांचे कौतुक केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT