Ajit Pawar: अजितदादा मीडियावर संतापले, चिडण्याचं नेमकं कारण काय?
Ajit Pawar Angry: जय पवारांच्या उमेदवारीबाबत जे विधान केलं त्याचा विपर्यास करण्यात आला असं म्हणत अजित पवार हे पुण्यात पत्रकारांवरच संतापले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवार माध्यमांवर प्रचंड संतापले
जय पवार यांच्या उमेदवारीबाबत केलेले विधान
या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हणत अजित पवार चिडले
Ajit Pawar Angry: पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री हे आज (16 ऑगस्ट) पुण्यात आलेले असताना पत्रकारांवर प्रचंड चिडलेले पाहायला मिळाले. जय पवार यांच्या बारामतीच्या उमेदवारीबाबत माध्यमांनी योग्यरित्या बातमी न दाखवल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी ते बरेच संतापलेले दिसून आले. (deputy chief minister ajit pawar got angry with the media what is real reason for getting angry what did say about jay pawar candidacy)
अजित पवार का चिडले?
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मी मुलाखती देतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी देतो.. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, प्रत्येक वेळेस आलं की, मुलाखती द्या म्हणजे बाईट द्या.. हे काही बरोबर नाही. कधी तरी बाईट ठीक आहे.'
'आणि कसंय.. तुम्हीही काहीही प्रश्न विचारता. कालच मी बघितलं.. तुम्ही बातमी काय चालवली.. तुम्ही प्रश्न असा विचारला होता की, अमूक-अमूक मागणी करतायेत आणि ते उभं राहायचं म्हणतायेत.. मी म्हटलं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणालाही उभं राहता येतं. तुम्ही तिसऱ्याच बातम्या चालवता. त्यामुळे मला काही बोलायचंच नाही.'
हे ही वाचा>> Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?
'आमच्या सदविवेक बुद्धीला स्मरून व्यवस्थित काम करतोय. आम्हाला युती टिकवायची आहे. आम्ही त्या पद्धतीने काम करतोय.'
'प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे असं काही नाही.. आम्हाला जेवढ्या गोष्टी पत्रकार परिषद घेऊन सांगायच्या तेवढ्या आम्ही सांगतो आणि ते आमचं कर्तव्य आहे. पण ज्या गोष्टी पत्रकारांना सांगून सगळीकडे माहिती द्यायचं काही काम नाही. कारण काही गोष्टी अशा असतात की, त्या आमच्या अंतर्गत चर्चा असतात.' असं म्हणत अजित पवार यांनी त्यांची नाराजी जाहीर केली.
