Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?

रोहित गोळे

Ajit Pawar Baramati Vidhan Sabha: बारामती विधानसभेची जागा सेफ करण्यासाठी अजित पवार हे कोणती नवी रणनिती आखत आहेत याविषयी जाणून घ्या सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?
Ajit Pawar: अजितदादांचा 'हा' कोणता डाव?, बारामतीची जागा सेफ करण्यासाठी नवी खेळी?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांची बारामतीसाठी नवी खेळी

point

अजित पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत?

point

अजित पवार बारामतीची जागा सेफ करु शकतील?

Sharad Pawar vs Ajit Pawar Baramati: बारामती: 'दादाचा वादा...' ही टॅगलाइन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहेत. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी जे विधान केलं होतं ते सध्या चर्चेत आहे. त्याच विधानाच्या अनुषंगाने अजित पवार हे बारामती विधानसभेसाठी नवी रणनिती तर करत नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. (maharashtra vidhan sabha election 2024 what is ajit pawar new move to secure the seat of baramati vidhan sabha)

बारामतीची जागा सेफ करण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी?

बारामतीची जागा सेफ करण्यासाठी अजित पवार हे एखादी नवी रणनिती आखत आहेत का? याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.. 

अजित पवार यांनी काल (14 ऑगस्ट) एका मुलाखतीत म्हटलं की, त्यांनी सुप्रिया सुळेविरोधात आपल्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना उभं करणं ही त्यांची चूक होती.

हे ही वाचा>> Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, अजितदादा मुलासाठी बारामती विधानसभा सोडणार?

त्यानंतर आज (15 ऑगस्ट) म्हणजे दुसऱ्याच दिवशी अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना बारामतीमधून तिकीट देण्यात यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आणि त्याला अजित पवार यांनी देखील एक प्रकारे पाठिंबा दिला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp