एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि ती महिला अधिकारी... प्रकरण नेमकं काय?
गिरीश महाजन यांनी खडसेंचे आरोप फेटाळून लावले. तसंच त्यांनी जो दावा केलाय, त्याचे पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी आपण हे केले नसून, अनिल थत्ते यांनी ते केले आहेत असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गिरीश महाजन यांच्याबद्दल काय म्हणाले एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे यांनी ज्या अनिल थत्तेंचं नाव घेतलं ते कोण?
एकनाथ खडसे यांनी ज्या महिला अधिकाऱ्याचं नाव घेतलं त्या कोण?
Eknath Khadse Vs Girish Mahajan : एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातला वाद नवा नाही. दोघांमध्ये आता पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या वादात एका महिला अधिकाऱ्याचाही उल्लेख केला जातोय. महिला अधिकाऱ्याचा उल्लेख होत असल्यानं या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा >>सोवळं-जाणवं नसल्यानं रामदास तडस यांना रोखलं, रामनवमीच्या दिवशी मंदिरात काय घडलं?
आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याच्या जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. त्यानंतर या चर्चेला सुरूवात झाली. महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप करत, त्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
'गृहमंत्र्यांनीही केली होती चौकशी'
"2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात सामील करून घेण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाजन यांना याबद्दल विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी महिला आयएएस अधिकाऱ्याशी असलेल्या कथित संबंधांवरुन प्रश्न उपस्थित केले होते" असा दावा खडसे यांनी केला होता.
गिरीश महाजन यांचं उत्तर
गिरीश महाजन यांनी खडसेंचे आरोप फेटाळून लावले. तसंच त्यांनी जो दावा केलाय, त्याचे पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय. महाजन म्हणाले, "खडसे यांच्याबद्दल बोललो तर ते समाजात कुणालाही तोंड दाखवू शकणार नाहीत. मी ज्या प्रकरणाबद्दल बोलत आहे ते त्यांच्याच घराशी संबंधित आहे. मी हे प्रकरण उघड केलं तर लोक त्यांना मारतील."










