सोवळं-जानवं नसल्यानं रामदास तडस यांना रोखलं, रामनवमीच्या दिवशी मंदिरात काय घडलं?
Ramdas Tadas: रामदास तडस यांनी या घटनेनंतर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. "रामनवमीचा दिवस आहे, संघर्ष योग्य नाही," असे त्यांनी समजावताना सांगितले. दरम्यान, स्थानिक आमदारांनीही पुजाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रामदास तडस यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं
सोवळं-जानवं नसल्यानं रामदास तडस यांना जाऊ दिलं नाही
रामदास तडस यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला
Ramdas Tadas : भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना रामनवमीच्या दिवशी वर्धा येथील राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, चर्चांना तोंड फुटलं आहे.
मंदिरात नेमकं काय घडलं?
रामदास तडस हे रामनवमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, त्यांनी सोवळं आणि जानवं परिधान न केल्याने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना गर्भगृहात जाण्यापासून रोखलं. "तुम्ही दुरूनच दर्शन घ्या," असं पुजाऱ्यांनी सांगितल्याचा दावा तडस यांनी केला आहे. यावरून पुजारी आणि तडस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची माहितीही समोर आली आहे.
हे ही वाचा >> हॉटेल मालकाला बाहेर काढलं, लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारलं! बारामतीतल्या 'त्या' व्हिडीओवर दादाही संतापले
रामदास तडस यांचा संताप...
रामदास तडस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले, "मी चाळीस वर्षांपासून दर रामनवमीला या मंदिरात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांसाठी भव्य मंदिर उभारलं, पण इथे मला प्रवेश नाकारला गेला. हे योग्य नाही."
रामदास तडस यांनी मंदिराच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "या मंदिराची दोनशे एकर जमीन आहे, पण तरीही सर्व खर्च आम्हीच करतो. पुजाऱ्यांची मक्तेदारी इथे चालते," असे त्यांचं म्हणणं आहे.










