Eknath Shinde : “ते दरोडेखोर आम्हाला…”, CM शिंदे उद्धव ठाकरेंवर बरसले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Eknath Shinde criticized Uddhav Thackeray and Aditya Thackeray that those looting the coffers of Mumbai Municipal Corporation are accusing us.
Eknath Shinde criticized Uddhav Thackeray and Aditya Thackeray that those looting the coffers of Mumbai Municipal Corporation are accusing us.
social share
google news

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Maharashtra news Marathi : भाजप नेत्याने ऑफर दिली होती. मी चार मुद्द्यांचं शपथपत्र दिलं असतं, तर तेव्हाच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं असतं. मी नकार दिला आणि ईडी-सीबीआयने कारवाई सुरू केली, या अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. यावर बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

मुंबईत वाढतं प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. धूळ आणि वायू प्रदूषणासाठी रस्त्यांची सफाई करण्याबरोबरच रस्ते धुण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना देशमुखांनी केलेल्या दाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले.

एकनाथ शिंदे काय बोलले?

अनिल देशमुखांनी एक दावा केला की, भाजपचे नेते आमच्याकडे आले होते. चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र त्यांनी देण्यास सांगितलं होतं. त्यांची ऑफर स्वीकारली असती, तर महाविकास आघाडी सरकार हे तेव्हाचं कोसळलं असतं, असे सांगत माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ते गेलं सरकार. सरकारबरोबर सगळं गेलं. म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय. जी घाण अडीच वर्षात झाली आहे, ती सफाई करतोय.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शरद पवार म्हणाले, “गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल, त्यांनी 25 कोटींचा चेक पाठवला”

“काही लोक म्हणताहेत मुंबईची लूट होतेय. परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला. ते दरोडेखोर आमच्यावर आरोप करत असतील, तर ही जी काही स्वच्छता आहे, ती मुंबईकरांसाठी करतो आहोत. त्यामुळे हे डीप क्लिन जे आहे, पण विरोधकांना क्लिन स्वीप (सुफडा साफ) होऊ. या भीतीने त्यांची भंबेरी उडालेली आहे. पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आम्ही कामांनी उत्तर देतो.

अनिल देशमुखांनी काय केलाय गौप्यस्फोट?

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी शनिवारी (23 डिसेंबर) महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपकडून आलेल्या ऑफरबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. ‘भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा दूत माझ्याकडे आला आणि मला कारवाईपासून संरक्षण देण्याची खात्री दिली. त्याबद्दल चार मुद्द्यांचं शपथपत्र देण्यास सांगितलं. मी तसं केलं असतं, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआचं सरकार पडलं असतं. मी नकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्यावर ईडी, सीबीआयची कारवाई सुरू झाली”, असा दावा देशमुखांनी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT