Kirit Somaiya : जितेंद्र आव्हाड सोमय्यांच्या बाजूने! सांगितला शरद पवारांचा किस्सा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांसोबतचा एक प्रसंग सांगत भाष्य केले आहे.
ADVERTISEMENT
Kirit Somaiya News : महाराष्ट्रात किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली असून, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या प्रकरणाचा निषेध केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणावर त्यांची भूमिका मांडली आहे.
वाचा >> Kirit Somaiya यांच्या आक्षेपार्ह Video प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची सभागृहात ‘ती’ मोठी घोषणा
किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण : जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तिक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तिक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल, तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तिकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> Kirit Somaiya : ‘महिलांना फोन करून…’, सोमय्यांच्या व्हिडीओवर अनिल परबांनी काय सांगितलं?
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उद्ध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असताना एखाद्याला 5 मिनिटांत उद्ध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही”, असं जितेंद्र आव्हाडांनी किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणावर म्हटलं आहे.
भाजप नेत्याचा सातबारा महिलेच्या नावावर… शरद पवार आव्हाडांना काय म्हणाले होते?
“मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबाऱ्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले, जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात. त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही”, असा प्रसंग जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या प्रकरण चर्चेत आल्यानंतर सांगितला.
ADVERTISEMENT