Maharashtra News live : घाटकोपर होर्डिंग प्रकरणी फडणवीसांनी केली मोठी कारवाई, IPS अधिकारी निलंबित
Maharashtra News Live : राजकारण, निवडणूक, सामाजिक घटना, गुन्हेगारी... महाराष्ट्रासह देशातील सर्व महत्त्वाच्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
Maharashtra Breaking News live : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, तर दिल्लीत लोकसभा निवडणुकीनंतरचे पहिले संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे.
आता होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी भाजप बहुमतापासून दूर राहिली. तर विरोधी बाकांवरील खासदारांची संख्या मोठी वाढली आहे. त्यामुळे विरोधकांचा आवाज वाढला आहे.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. 2 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार असून, उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुकांकडून प्रयत्न होताना दिसत आहे.
राजकारणाशी संबंधित घटनांची माहिती, महाराष्ट्रातील सर्व घटनांचे अपडेट्स वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 08:11 PM • 25 Jun 2024
Maharashtra News Live Update: घाटकोपर होर्डिंग अपघातप्रकरणी आयपीएस अधिकारी निलंबित
घाटकोपर होर्डिंग अपघातप्रकरणी राज्याच्या गृहमंत्रालयाने एक मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणी प्राथमिक चौकशीनंतर आयपीएस कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आलं आहे.तो रेल्वे पोलीस आयुक्त होते आणि त्यांनीच होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती.
- 04:12 PM • 25 Jun 2024
Maharashtra News: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट! अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मुख्य अल्पवयीन आरोपीला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्याने केला होता.
- 02:38 PM • 25 Jun 2024
Maharashtra Updates : माकपला हव्या 'या' 12 जागा, मविआ काय करणार?
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे. दरम्यान, माकपने 12 जागांची मागणी केली आहे.
माकपच्या शिष्टमंडळाने नाना पटोले यांची भेट घेतली. डहाणू, कळवण, नाशिक पश्चिम, सोलापूर मध्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या विधानसभा मतदारसंघासह 12 जागांवर माकपने तयारी सुरू केली आहे.
माकपच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची मागील आठवड्यात भेट घेतली होती. आता उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहे. त्यामुळे मविआ काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे.
- 12:38 PM • 25 Jun 2024
Maharashtra News : सुजय विखेंना उत्तर, निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतली शपथ
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर निलेश लंकेंनी मंगळवारी (25 जून) खासदारकीची शपथ घेतली.
निलेश लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी निलेश लंकेंना इंग्रजी येत नसल्याच्या मुद्द्यावरून हिणवले होते.
लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखेंना उत्तर दिले असल्याची चर्चा आता राज्यभर रंगली आहे.
- 10:43 AM • 25 Jun 2024
Maharashtra News Live : "सरकार पुरस्कृत पैसे वाटपाचा...", जयंत पाटलांचे सरकारला खडेबोल
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावरून आता जयंत पाटील यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
"येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात अनेक लोकानुनयी घोषणांचा पाऊस पडण्याची येत्या काळात शक्यता आहे. मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात दरमहा काही ठराविक रक्कम जमा करण्याच्या योजनेची चाचपणी सरकारी पातळीवर सुरू असल्याचे समजते. मात्र, प्रत्येक राज्याची लोकसंख्या, जनतेचे प्रश्न आणि गरजा आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जनतेची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असल्याचे सरकारने समजून घेतले पाहिजे. सरकार पुरस्कृत पैसे वाटपाचा कितीही कार्यक्रम झाला, तरी महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही", असे जयंत पाटील म्हणाले. - 09:15 AM • 25 Jun 2024
Maharashtra news live : "सुपरफास्ट देवाभाऊ किमान संवेदनशील...", रोहित पवारांची टीका
ड्रग्ज प्रकरणामुळे पुणे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावरून राजकारणही रंगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले. त्याला चंद्रकांत पाटील उत्तर दिले.
आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर पक्षविस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवारांची पोस्ट
‘मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही’ असं सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील दादांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या #कॅथा_इडूलीस या ड्रग्सचाही समावेश आहे.
आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडते पुणे झाले आहे.
पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्सचा मुद्दा समोर आणला होता, पण तेंव्हा फडणवीस साहेबांनी गोलगोल उत्तरं देऊन टाळाटाळ केली होती.
सुपरफास्ट देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी सिरीयस व्हा… आजी-माजी पालकमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे, पक्षविस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा.. अन्यथा या सांस्कृतिक शहरासह हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही.
- 09:06 AM • 25 Jun 2024
Maharashtra Breaking news : पंकजा मुंडेंबद्दल वादग्रस्त पोस्ट करणे भोवले, तरुणाला बेड्या
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अर्वाच्य भाषेत पोस्ट केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
या प्रकरणात जिंतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि संबंधित तरुणाला अटक केली. अभि तळेकर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT