लाइव्ह

Maharashtra News Live : जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर हायवेवर रास्तारोको

मुंबई तक

ADVERTISEMENT

jalana, obc protest
jalana, obc protest
social share
google news

Maharashtra News Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी असल्याचीही चर्चा सुरू आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नको, असा सूरही भाजपमधून आता लावला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत. 

एकीकडे राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, तर दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या सगळ्या संदर्भातील लाईव्ह अपडेट्स वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

 • 07:09 PM • 18 Jun 2024

  जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर हायवेवर रास्तारोको

  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री भागात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकाही नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणानंतर लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहे. जालन्यातल्या वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलकांनी  धुळे-सोलापूर हायवेवर रास्तारोको केला आहे. तसेच टायर पेटून आंदोलन देखील केले आहे. 

 • 03:32 PM • 18 Jun 2024

  Jalna News : चंद्रकांत खैरेंनी वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंची घेतली भेट

  उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वडीगोद्री येथे भेट दिली. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना प्रकृती सांभाळण्याचे आवाहन खैरे यांनी केले.आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. मी राजकीय व्यक्ती असल्याने जास्त काही बोलत नाही, असे ते म्हणाले.

 • 12:17 PM • 18 Jun 2024

  Maharashtra News : पुण्यात पोलीस भरती विद्यार्थ्यांचे आंदोलन

  पुण्यात पोलीस भरती विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. वय वाढवून मिळावं यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. 2022-23 साली वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी यासाठी हे आंदोलन आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे.

   

 • 11:47 AM • 18 Jun 2024

  Lok Sabha Election 2024 : लोकसभा अध्यक्ष कोण होणार?

  लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी आज बैठक होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. लोकसभा अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाबाबत चर्चा होणार आहे.  अश्विनी वैष्णव , जेपी नड्डा, किरण रेजीजू यांच्यासह एनडीए मधील घटक पक्षातील नेतेही उपस्थित राहणार आहेत. लोकसभा अध्यक्ष पदाबाबतच्या निवडीची राजनाथसिंह यांच्यावर जबाबदारी आहे.

   

 • ADVERTISEMENT

 • 10:31 AM • 18 Jun 2024

  Maharashtra News : ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत- मनोज जरांगे पाटील

  'आरक्षण असतानाही ओबीसींचा लढा सुरू आहे. ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत. आता मराठा समाजही आरक्षणासाठी एकत्र येणार. मराठी समाज सर्व भेद सोडून एकत्र येणार.' अशा शब्दात मनोज जरांगेंनी निशाणा साधला. 

 • 08:59 AM • 18 Jun 2024

  OBC Resrvation : लक्ष्मण हाकेची कठोर भूमिका

  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारसोबत चर्चेसाठी आपले कोणतेही शिष्टमंडळ जाणार  नसल्याचे सांगितले आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी ओबीसींबाबत आपण 12 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करत आहोत, या भावनेनं वागावं असा सल्ला हाके यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीकडून सरकारसोबत चर्चेसाठी कोणतेही शिष्टमंडळ जाणार नसल्याचा निर्णय झाल्याचं देखील हाके यांनी सांगितलं.

 • ADVERTISEMENT

 • 08:52 AM • 18 Jun 2024

  Maharashtra News : नाशिकमध्ये आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने येणार?

  नाशिक शिक्षक विभाग मतदार संघात आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि दादा भुसे आमने-सामने येऊ शकतात.  राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार तर शिवसेनेकडून नरेंद्र दराडे मैदानात आहेत. महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने पेच वाढला आहे.

   

 • 08:48 AM • 18 Jun 2024

  Maharashtra Politics : छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार?

  गेल्या काही महिन्यांपासून छगन भुजबळ यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांना राज्यसभा निवडणुकीतही संधी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. संधी मिळाल्याबद्दलची खंत त्यांनीही व्यक्त केली. 

  अशात सोमवारी (17 जून) समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत भुजबळ यांची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भुजबळांना वेगळा निर्णय घेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. पक्षात सातत्याने डावलण्यात येणे, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसींवर अन्याय होणे, त्यामुळे आता वेगळा निर्णय घ्या, असे समता परिषदेचे पदाधिकारी भुजबळांना म्हणाले.

  गेल्या काही दिवसांपासूनच भुजबळ अजित पवारांची साथ सोडून जाणार, अशी चर्चा आहेत. त्यात समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडूनच अशी मागणी झाल्याने भुजबळ वेगळा निर्णय घेणार का? अजित पवारांची साथ सोडली, तर ते कोणत्या पक्षात जाणार? याबद्दलची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

   

 • 08:48 AM • 18 Jun 2024

  Maharashtra News : नांदेडमध्ये भाजप आभार बैठकीत राडा

  नांदेड लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाची कारण मिमांसा शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे येत्या २० जून रोजी नांदेड दौऱ्यावर येतं आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच नांदेडमध्ये मात्र पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी भाजपाच्या आभार बैठकीत महानराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि पदाधिकाऱ्यामध्ये शाब्दिक राडा झाला. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. या प्रकारानंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. भाजपाचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयड यांच्या वाद झाला. या राड्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
   

 • 08:47 AM • 18 Jun 2024

  Jalna News : लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही...

  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारसोबत चर्चेसाठी आपले कोणतेही शिष्टमंडळ जाणार  नसल्याचं सांगितलं असून आजच्या कॅबिनेट मध्ये मंत्र्यांनी ओबीसी बाबत आपण 12 कोटी जनतेच प्रतिनिधित्व करत आहोत, या भावनेनं वागावं असा सल्ला हाके यांनी सरकार ला दिलाय. दरम्यान वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समिती ने सरकारसोबत चर्चेसाठी कोणतेही शिष्टमंडळ जाणार नसल्याचां निर्णय झाल्याचं देखील हाके यांनी सांगितलं.
   

follow whatsapp

ADVERTISEMENT