Jalna: मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांचा एल्गार! आंतरवाली सराटीत तुफान गर्दी
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज (14 ऑक्टोबर) जालन्यातील त्यांच्या आंतरवली सराटी गावात मराठा समाजाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज (14 ऑक्टोबर) जालन्यातील त्यांच्या आंतरवली सराटी (Antarwali Sarati) गावात मराठा समाजाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन केले आहे. मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार सुरूच आहे. (Manoj Jarange Patil again held a Sabha for Maratha reservation at Jalna Antarwali Sarati)
ADVERTISEMENT
IND Vs PAK: भारत-पाक सामन्याला उरले अवघे काही तास, ‘इथे’ पाहाता येईल Free सामना
या सभेसाठी महाराष्ट्रातील समस्त मराठा बांधवांनी जालन्याच्या दिशेने पाऊल वळवलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे 40 दिवसांचा वेळ मागितला होता. यावेळी या 40 दिवसात आरक्षणाच्या या मुद्द्यावर तोडगा काढू असं आश्वासन राज्य सरकारने त्यांना दिलं होतं.
IND vs PAK : विजयासाठी टीम इंडियाला करावं लागणार फक्त ‘हे’ काम!
जरांगे पाटलांनी त्यांच्या विनंतीचा मान राखत हे उपोषण मागे घेतलं होतं. पण जर 40 दिवसात आरक्षणचा मुद्दा मार्गी लावला नाही तर पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू करणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता.
हे वाचलं का?
40 दिवसांचा हा काळ आता संपला आहे. यावर कोणताही तोडगा निघालेला नाही त्यामुळे लोकांचं लक्ष जालन्यातील या सभेवर आहे. मनोज जरांगे पाटी सभेत काय बोलणार? कोणती भूमिका मांडणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Satara: उदयनराजे भोसले राजकारणातून होणार निवृत्त? चक्क शरद पवारांनाही दिला सल्ला!
आंतरवाली सराटीत सभेची जंगी तयारी!
मनोज जरांगे यांच्या सभेसाठी रात्रीपासूनच आंतरवली सराटीत तुफान गर्दी झाली आहे. रात्रभर मुक्काम करुन आज सभेला सर्वजण उपस्थिती लावणार आहेत. पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 160 एकरावर मंडप उभारण्यात आला आहे. मंडपाला ‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ असे नाव देण्यात आले आहे. तसंच सर्वांना सभा दिसावी यासाठी मोठमोठ्या स्क्रीनची सोय करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT