Mood of The Nation LIVE : महाविकास आघाडी की महायुती? महाराष्ट्राचा कौल कोणाच्या बाजूने?
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं. त्यानंतर आता 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार' असं शरद पवार गटाला नवीन नाव मिळालं आहे. हे नाव फक्त राज्यसभा निवडणूक 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. याविषयीच्या सर्व अपडेट्स आणि महाराष्ट्रातील इतर घडामोडी तुम्हाला लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचता येतील.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला आहे. २६ जानेवारीला पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ करण्यात आली होती. या रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आता जिल्हा सत्र न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे. २६ तारखेला सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदारसंघात काँग्रेसने आंदोलन केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 04:54 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : गोव्यात भाजप-काँग्रेसला 1-1 जागा मिळणार : सर्वे
गोव्यात लोकसभेच्या दोन जागा असून गेल्या निवडणुकीत 1 जागा भाजपने तर 1 जागा काँग्रेसने जिंकली होती. गोव्यातील जनतेला पुन्हा एकदा त्याच निकालाची पुनरावृत्ती करायची आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला 37.1 टक्के, काँग्रेसला 47 टक्के आणि आम आदमी पार्टीला 8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
- 04:41 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : गुजरातमध्ये भाजप क्लिन स्वीप मारणार
इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्वेक्षण 'मूड ऑफ द नेशन'मध्ये भाजप पुन्हा एकदा गुजरातमध्ये क्लीन स्वीप करत असल्याचे दिसून आले आहे. गेल्यावेळी भाजपने राज्यातील सर्व 26 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी पुन्हा राज्यात भाजपवर जनतेचा विश्वास कायम आहे. गुजरातमध्ये भाजपची मतांची टक्केवारी 62.1 टक्के आहे. तर काँग्रेसचे मताधिक्य 26.4 टक्के आहे. उर्वरित लहान पक्षांची टक्केवारी 12 टक्के आहे.
- 04:28 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : ठाकरेंचे खासदार संजय राऊत सर्व्हेवर काय म्हणाले?
मूड ऑफ द नेशनच्या सर्वेवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्रितपणे 48 पैकी 35 जागा जिंकणार आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आम्हाला 30-35 जागा जिंकायच्या आहेत.
- 04:21 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी एनडीएने 2019 च्या निवडणुकीत 41 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 22 जागा भाजपने, तर शिवसेनेने 19 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा शिवसेना फुटली नव्हती आणि तो एकच पक्ष होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यापैकी 6 जागा जिंकल्या. त्यापैकी राष्ट्रवादीला 4, तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली. तर औरंगाबादमध्ये ओवेसींच्या पक्ष AIMIM चे उमेदवार विजयी झाले होते.
महाराष्ट्र
भाजप : 22
काँग्रेस : 12
शिवसेना-राष्ट्रवादी : 14 - 04:18 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : राज्यात महायुती महाविकास आघाडीवर पडणार भारी
महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीवर (भाजप, शिंदे आणि अजित पवार गट) यांची महायुती मात करताना दिसत आहे. मूड ऑफ द नेशनवर, विरोधी आघाडीला 48 पैकी 26 जागा मिळताना दिसत आहेत. जिथे महायूतीला 40.5 टक्के मतं मिळत आहेत. तर महाविकास आघाडीला 44.5 टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे.
- 03:48 PM • 08 Feb 2024
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकरची छापेमारी
एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख बनलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाकडून या प्रकरणात काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत. ते वर्षभरापासून अधिक काळ जेलमध्ये होते. त्यानंतर नुकतंच त्यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला होता. ते जामिनावर बाहेर होते. त्यांचं अंधेरी आणि आणखी एका ठिकाणी निवासस्थान असल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या प्रकरणात आयकवर विभागाची छापेमारी सुरु आहे.
- 03:15 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : पंजाबमध्ये आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये फाईट
- 03:13 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होणार
- 03:11 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : हिमाचलमध्ये भाजपची एकहाती सत्ता?
- 03:09 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : उत्तरप्रदेशमध्ये भाजप किती जागा जिंकणार?
- 03:06 PM • 08 Feb 2024
Mood Of The Nation Live : आंध्र प्रदेशात टीडीपी सर्वाधिक जागा जिंकणार
आंध्र प्रदेशात आता मतदान झाले तर चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला लोकसभेच्या 25 पैकी 17 जागा मिळू शकतात, तर जगन मोहन यांच्या पक्षाला 8 जागा मिळू शकतात. काँग्रेस - भाजपचे हात रिकामे राहण्याची शक्यता आहे.
मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणानुसार, देशात आता निवडणुका झाल्या तर आंध्र प्रदेशात वायएसआरसीपीला 41.1 टक्के मते मिळतील. टीडीपीला 45 टक्के, काँग्रेसला 2.7 टक्के आणि भाजपला 2.1 टक्के मते मिळत आहेत.
- 03:01 PM • 08 Feb 2024
Mood OF The Nation Live : कर्नाटकात भाजप आघाडीला 24 जागा मिळण्याचा अंदाज
मूड ऑफ द नेशनच्या आकडेवारीनुसार, जर आता निवडणुका झाल्यास कर्नाटकात भाजप आघाडीला 24 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस आघाडीला 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते. यावेळी राज्यात भाजप आणि जेडीएसची युती आहे.
सर्व्हेनुसार कर्नाटकात यावेळी भाजपच्या मतांची टक्केवारी वाढताना दिसत आहे. कर्नाटकात भाजप प्लसला 52 टक्के मते मिळत आहेत, तर काँग्रेसला 42.3 टक्के मते मिळत आहेत, तर इतरांना 4.8 टक्के मते मिळत आहेत.
- 02:24 PM • 08 Feb 2024
पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा होण्याची शक्यता
शरद पवार दिल्लीतून आल्यानंतर लोकसभेपूर्वी पुढील कामकाजाला लागतील. त्यांचा राज्यव्यापी दौरा होण्याची शक्यता आहे. 15, 16 आणि 17 तारखेला बारामती लोकसभा मतदरासंघात ते दौरा करणार आहेत असं बोललं जात आहे. तसंच, 18 तारखेला पवाारांचा पुरंदर दौरा असेल. 21 तारखेला आंबेगाव या दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात दौरा असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत.
- 02:24 PM • 08 Feb 2024
ते गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही- बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यावर वड्डेटीवारांनी सुनावलं
बाबा सिद्दीकी यांनी आज कॉंग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची बातमी ट्वीट शेअर करून दिली आहे. सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सहभागी होणार आहेत अशी चर्चा आहे. आता या सर्वावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'सिद्दीकी हे धर्मांध पक्षात जात आहेत. ज्यांच्या मागे एजन्सी लागली आहे ते विचारधारा सोडून जात आहेत. पण ते गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही.' असं वड्डेटीवार यांनी सुनावलं.
- 01:59 PM • 08 Feb 2024
Mood OF The Nation Live : छत्तीसगडमध्येही भाजपला मोठा फायदा
इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्वेक्षण 'मूड ऑफ द नेशन'मध्ये छत्तीसगडमध्येही भाजपला मोठा फायदा झाला आहे. येथे भाजपला 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेस केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
- 01:58 PM • 08 Feb 2024
Mood OF The Nation Live : मध्य प्रदेशात भाजपला 27 जागा मिळण्याचा अंदाज
मूड ऑफ नेशननुसार, मध्य प्रदेशात भाजपला 27 जागा मिळताना दिसत आहेत, तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल. तथापि, सर्वेक्षणानुसार, या निवडणुकीत काँग्रेसला एक जागा मिळू शकते, ज्यामध्ये पक्षाला फक्त एक जागा मिळाली होती.
मध्यप्रदेश
भाजप : 27
काँग्रेस : 02 - 01:04 PM • 08 Feb 2024
Mood OF The Nation Live : हरियाणात भाजपच्या दोन सीट घटणार
मूड ऑफ द नेशननुसार, हरियाणातील 10 जागांपैकी 8 जागा भाजपला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला दोन जागांचा फायदा होत आहे. दरम्यान गेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.
हरियाणा
भाजप : 8
काँग्रेस : 2 - 01:04 PM • 08 Feb 2024
Mood OF The Nation Live : पंजाबमध्ये 'आप'च्या मतांचा टक्का वाढला
पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. जर आज निवडणूक झाली तर आम आदमी पार्टीची मतांची टक्केवारी 27.2 टक्क्यांवर गेली असती. गेल्या निवडणुकीत 'आप'ला एक जागा मिळाली होती, ती आता 5 जागांवर पोहोचली आहे. तर काँग्रेसला 37.6 टक्के, भाजपला 16.9 टक्के, अकाली दलाला 14.4 टक्के आणि इतरांना 3.9 टक्के मते मिळत आहेत.
पंजाब
आप : 5
काँग्रेस : 5
भाजप : 2
अकाली दल : 1 - 01:01 PM • 08 Feb 2024
बीडमध्ये धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक
आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज बीडमध्ये आक्रमक झालेले आहे. यशवंत सेनेचे अध्याक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
- 12:46 PM • 08 Feb 2024
भरत गोगावले यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात शिवसेना शिंदे गटाने हायकोर्टत आव्हान दिले होते. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही म्हणून नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. यावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT