Ravi Rana on Mazi Ladki Bahin: '1500 रुपये खात्यातून परत घेईन', महिला प्रचंड संतापल्या; रवी राणांना थेट...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आमदार रवी राणा यांच्या लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्यानंतर महिला आक्रमक

point

रवी राणा यांना पोस्टाने पाठवल्या बांगड्या

point

रवी राणा यांच्या वक्तव्याचा महिला काँग्रेस कमिटीने नोंदविला निषेध

Ravi Rana: गौरव साळी, जालना: भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी 'माझी लाडकी बहीण' योजनेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जालन्यात महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. जालना येथील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रवी राणा यांना पोस्टाने बांगड्या पाठवत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. (mazi ladki bahin yojana will withdraw rs 1500 from bank account women furious strong agitation against mla ravi rana) 

ADVERTISEMENT

'आशीर्वाद म्हणून मला भरभरुन मतदान करा, नाही तर लाडक्या बहिणीच्या खात्यातील 1500 रुपये वापस घेणार.' असं विधान रवी राणा यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महिलांमध्ये संताप पाहायला मिळत असून जालन्यात महिला काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Aadhaar Card: 'ही' चूक असेल तर 1500 रुपये विसरा, चटकन 'हा' करुन घ्या बदल!

1500 रुपये रवी राणा यांच्या खिशातले नाही, गरीब महिलांचे मतदान मिळवण्यासाठी भाजप सरकारने महिलांना या योजनेचे आमिष दिलं असल्याचा आरोप जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा पवार म्हणाल्या आहेत. जर रवी राणा यांनी महिलांच्या खात्यातील 1500 रुपये घेतले तर त्यांना भर चौकात काळं फासू असा इशारा नंदा पवार यांनी दिला.

हे वाचलं का?

रवी राणा 1500 रुपयांबद्दल काय म्हणाले होते?

'1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की, 1500 रुपयांचे 3000 रुपये झाले पाहिजे. हे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा तुम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद द्याल. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही, तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल", असे रवि राणा म्हणाले होते.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana DBT Status Check: 1500 रुपये फक्त 'या' महिलांच्या खात्यात, झटपट तपासा तुमचं DBT Status

रवी राणांनी केली सारवासारव

"मी गंमतीने ते विधान केले होते. त्यानंतर अनेक महिला हसत होत्या. बहीण भावाचे नाते हे गंमतीचे असले पाहिजे. मात्र, विरोधक माझ्या विधानाचा बाऊ करत आहेत. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे", असं म्हणत रवी राणा यांनी सारवासारव करण्याचा बराच प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

मात्र, त्यांच्या या विधानावर विरोधक आक्रमक झाले आहेत. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांनी तर रवी राणांच्या विधानावरुन शिंदे सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT