Mazi Ladki Bahin Aadhaar Card: 'ही' चूक असेल तर 1500 रुपये विसरा, चटकन 'हा' करुन घ्या बदल!

मुंबई तक

ADVERTISEMENT

'ही' चूक असेल  तर 1500 रुपये विसरा, चटकन 'हा' करुन घ्या बदल!
'ही' चूक असेल तर 1500 रुपये विसरा, चटकन 'हा' करुन घ्या बदल!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात

point

अनेक महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत

point

आधारकार्ड बँकेशी लिंक असेल तरच मिळतील 1500 रुपये

Mazi Ladki Bahin Aadhaar Card Update: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज हे पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात आता पैसेही येऊ लागले आहेत. आजपासून (14 ऑगस्ट) सरकारने महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे. पण असं असलं तरीही अनेक अर्जदार महिलांची नावं ही अद्यापही पात्रता यादीत आलेली नाही. आता ती का नाही आली याची वेगवेगळी कारणं असू शकतात. पण अर्जात जर एक चूक असेल तर 1500 रुपयांना मुकावं लागू शकतं. (aadhaar card is not linked with bank account then women will not get mazi ladki bahin yojana benifit and rs 1500)

ADVERTISEMENT

आता ही चूक म्हणजे अर्जदार महिलेचं आधारकार्ड हे जर बँक खात्याशी सलंग्न नसेल तर त्या महिलेला 1500 रुपये हे मिळूच शकणार नाही. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत असे हजारो अर्ज आढळून आले आहेत की,  त्यामधील अर्जदार महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात सरकार जी आर्थिक मदत जमा करणार आहे ती होऊच शकणार नाही.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana List 2024 PDF: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?

यामुळे संबंधित दुरुस्तीसाठी अर्जदार महिलांना त्यांच्या बँकेला भेट द्यावी लागेल आणि बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करून घ्यावं  लागेल.

हे वाचलं का?

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातील. यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधारशी (आधार सीडिंग) लिंक करावे.

"मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजनेसाठी अर्ज करताना लाभाची रक्कम थेट (DBT द्वारे) अर्जात नमूद केलेल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे महिलांनी त्यांची बँक खाती आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. बँक खात्याचे ई-केवायसी करणे देखील आवश्यक आहे. जवळच्या सेतू केंद्रावर ई-केवायसी करता येते. मात्र, बँक खाते आधार संलग्न करण्याची प्रक्रिया संबंधित बँकेला भेट देऊनच करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : खात्यात एक रुपया पोहोचलाच नाही, 'त्या' 16 लाख महिला अर्जदारांचं काय होणार?

यासोबतच तुमच्या आधारकार्डवरील जो मोबाइल नंबर आहे तो तुमच्या बँक खात्यात नोंदणी असणंही गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यात नेमके किती पैसे जमा होत आहेत याची नेमकी माहिती मिळेल.

ADVERTISEMENT

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • अर्ज क्रमांक
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते क्रमांक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT