mu senate election : सिनेट निवडणुकीचा ‘रात्रीस खेळ’, आदित्य ठाकरेंची चौघांनी सोडली साथ
Mumbai University senate election news in Marathi : मुंबई विद्यापिठाच्या सिनेटच्या निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच रंगलंय. 17 ऑगस्टच्या रात्री विद्यापीठाने निवडणूक स्थगित करण्याचे आदेश काढले. तर दुसऱ्या दिवशी रात्री शिंदेंच्या शिवसेनेने डाव उलटवत आदित्य ठाकरेंना धक्का दिला. मुंबई विद्यापीठाच्या चार सिनेट सदस्यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबई विद्यापीठ सिनेटच्या 10 जागांसाठी निवडणूक […]
ADVERTISEMENT
Mumbai University senate election news in Marathi : मुंबई विद्यापिठाच्या सिनेटच्या निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच रंगलंय. 17 ऑगस्टच्या रात्री विद्यापीठाने निवडणूक स्थगित करण्याचे आदेश काढले. तर दुसऱ्या दिवशी रात्री शिंदेंच्या शिवसेनेने डाव उलटवत आदित्य ठाकरेंना धक्का दिला. मुंबई विद्यापीठाच्या चार सिनेट सदस्यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
ADVERTISEMENT
मुंबई विद्यापीठ सिनेटच्या 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मात्र, 17 ऑगस्ट रोजी रात्री विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक स्थगित केली. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे मुंबईतील राजकारण चांगलंच तापलं.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिवसभरात आदित्य ठाकरेंना धक्का दिला. निवडणूक स्थगित होण्याचा निर्णय होऊन 24 तास लोटत नाही, तोच 4 सिनेट सदस्यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडलीये. सध्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये दहा सदस्य असून, त्यातील चौघांनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
हे वाचलं का?
प्रवीण पाटकर, वैभव थोरात, महादेव जगताप, निखिल जाधव या सिनेट सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सिनेट निवडणुकीसाठी उमेदवार नसल्याचा आरोप विरोधकांकडून झाला. त्यानंतर ही मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
आदित्य ठाकरेंची टीका, अमित ठाकरेंचे राज्यपालांना पत्र
विद्यापीठाने सिनेट निवडणूक स्थगित केल्याने युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, युवक काँग्रेससह इतर विद्यार्थी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या. आदित्य ठाकरेंनी सरकार निवडणुकांना घाबरत असल्याचं सांगत हल्ला चढवला. तर आदित्य ठाकरेंना उत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राहुल कनाल यांनी बोगस मतदार नोंदणी होत असल्यामुळे निवडणुका रद्द झाल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT
दुसरीकडे मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी थेट राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनाच पत्र लिहिलं. या पत्रातून अमित ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर उल्लेख टाळत टीका केली. “राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील, तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकुमशाहीनेच कारभार हाकायचा आहे, हे स्पष्ट आहे”, असं अमित ठाकरे म्हणालेले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT