Bharat Jodo Yatra : १३६ दिवस, ३५७० किमी; राहुल गांधींमध्ये असा झाला बदल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर २०२२ या दिवशी सुरू झालेली राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ श्रीनगरमध्ये संपन्न झाली. (भारत जोडो यात्रेचा पहिल्या दिवसाचा फोटो)

हे वाचलं का?

हा प्रवास १० राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून झाला. यादरम्यान राहुल गांधींनी ३ हजार ५७० किलोमीटरची पदयात्रा केली. (भारत जोडो यात्रेचा केरळमधील फोटो)

ADVERTISEMENT

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर या राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून राहुल गांधी यांचा प्रवास झाला.

ADVERTISEMENT

यात्रेबाबत राहुल गांधी म्हणाले, मी लाखो लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. हा अनुभव कथन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या यात्रेचा, भेटीचा उद्देश देशाला एकत्र जोडणं हा होता.

हा प्रवास देशभर पसरलेल्या हिंसाचार आणि द्वेषाच्या विरोधात होता. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भारतातील लोकांची ताकदही प्रत्यक्ष पाहायला मिळाली, असं राहुल गांधी म्हणाले.

१३६ दिवसांच्या या प्रवासात राहुल गांधींनी १२ सभांना संबोधित केलं. तर १०० हून अधिक कॉर्नर सभा आणि १३ पत्रकार परिषदा घेतल्या. या व्यतिरिक्त २७५ हून अधिक वॉकिंग इंटरअॅक्शन आणि १००हून अधिक बैठे संवाद साधले.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. ही यात्रा कर्नाटकातील मंड्याला पोहोचली तेव्हा सोनिया गांधींनी त्यात सहभाग घेतला. त्यावेळी सोनिया गांधींच्या बुटाची लेस बांधतानाचा राहुल गांधी यांचा फोटो व्हायरल झाला होता.

भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोहोचली तेव्हा काही लोक ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत होते. त्यावर राहुल गांधींनी ‘फ्लाइंग किस’ देत प्रत्युत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारत जोडो यात्रेच्या ९५व्या दिवशी राहुल गांधी कोटामध्ये होते. यावेळी कोटा-लालसोट महामार्गावर त्यांनी बैलगाडीने प्रवास केला होता.

भारत जोडो यात्रा राजस्थानमधील दौसा येथे पोहोचली होती तेव्हा राहुल गांधी एका शेतकऱ्याच्या घरी थांबले होते. इथे त्यांनी गवत कापण्याच्या यंत्रावर काम करुन पाहिलं.

गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी रघुराम राजन यांची सुमारे तासभर मुलाखत घेतली होती.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली तेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग सिद्धू यांनीही यात सहभाग घेतला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली होती.

राहुल गांधी यांच्या पायी यात्रेचा काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत बराच फायदा होईल असं म्हटलं जात आहे. तो कसा हे येणाऱ्या काळात कळेलच. पण नेता म्हणून राहुल गांधी यांची इमेज मात्र या यात्रेमुळेच नक्कीच बदलली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT