Ganpat Gaikwad : भाजप आमदाराने गोळ्या झाडल्या.. पाहा संजय राऊत काय म्हणाले!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Sanjay Raut On BJP MLA Ganpat Gaikwad Shooting Case criticize CM Eknath Shinde Devendra Fadnavis
Sanjay Raut On BJP MLA Ganpat Gaikwad Shooting Case criticize CM Eknath Shinde Devendra Fadnavis
social share
google news

Sanjay Raut On Ganpat Gaikwad Case : ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर (Ulhasnagar) येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजप नेते गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांच्यावर गोळ्या झाडल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते महेश गायकवाड (Shivsena Leader Mahesh Gaikwad) यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. यानंतर हल्ल्याचं कारण सांगताना गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. (Sanjay Raut On BJP MLA Ganpat Gaikwad Shooting Case criticize CM Eknath Shinde Devendra Fadnavis)

ADVERTISEMENT

पोलिस ठाण्यात नेत्यांमधील युद्धासारख्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

वाचा : Poonam Pandey जिवंत आहे… Video च केला शेअर; म्हणते कशी मी तर…

अशा परिस्थितीत, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या टीकेची तोफ चांगलीच धडाडली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केल्या आहेत.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांचे गंभीर आरोप

‘जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. या प्रकारावरून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत. उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराला मुख्यमंत्री शिंदे जबाबदार आहेत. राज्य सरकारकडून गुंडांचा राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. राजकारणासाठी गुंडांना जामिनावर बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.’

वाचा : Lal Krishna Advani यांना भारतरत्न जाहीर, PM मोदींनी स्वत: केली घोषणा

‘कसलं कायद्याचं राज्य, गृहमंत्री कुठे आहेत?’, फडणवीसांवर राऊतांचं टीकास्त्र

‘पुणे, मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर यांसारख्या संवेदनशील शहरात अशा गुंडांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील काही गुंडांच्या सुटकेमागे 3 मंत्र्यांचा हात आहे. पोलीस ठाण्यात झालेला गोळीबार हा मुख्यमंत्री शिंदेंमुळे झाला असल्याचे आरोपीने स्पष्ट केले आहे. शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर गुन्हेगाराच तयार होणार. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच गोळीबार होतो हे गंभीर आहे. महाराष्ट्र इतका रसातळाला कधीच गेला नव्हता. कसलं कायद्याचं राज्य, गृहमंत्री कुठे आहेत?’ असा सवाल विचारत राऊतांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.

ADVERTISEMENT

वाचा : Ganpat Gaikwad: ‘… तर माझा जगून काय फायदा?’, शिंदेंच्या नेत्यावर गोळ्या झाडल्यानंतर भाजप आमदार काय म्हणाला?

‘देवेंद्र फडणवीस आपण वकील, ज्ञानी आहात. राम तुमच्या बाजूने आहे, रामावर तुम्ही हक्क सांगत आहात. रामाचे राज्य कायद्याचे राज्य होते, तुमचे आहे का? असा सवाल करत राऊतांनी निशाणा साधला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT