Uddhav Thackeray: ‘लढवय्यांच्या सेनेत प्रवेश केलात,तुम्ही पळपुटे…’,ठाकरेंचा CM शिंदेंना टोला

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

shishir dharkar join udhhav balasaheb thackeray shivsena uddhav thackeray criticize eknath shinde and bjp
shishir dharkar join udhhav balasaheb thackeray shivsena uddhav thackeray criticize eknath shinde and bjp
social share
google news

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर (Shishir Dharkar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिशिर धारकर यांच्यासह हजारो पदाधिकारी-कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झाले. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजप-शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. (shishir dharkar join udhhav balasaheb thackeray shivsena uddhav thackeray criticize eknath shinde and bjp)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीबाहेर येऊन शिशिर धारकर यांच्यासोबत आलेल्या आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना, तुम्ही लढवयांच्या सेनेत प्रवेश केल्याचे सांगत त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. तसेच काहीजण मोठा आव आणतात, डोळे वटारले की पळून जातात, तुम्ही पळपुटे नाहीत, याचा मला अभिमान असल्याचे विधान करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांना चिमटा काढला आहे. याचसोबत शेवटी अन्यायावर वार करणं आपली ख्याती आहे, अन्याय सहन करायचा नाही, असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.

हे ही वाचा : Dilip Walse Patil : शरद पवारांबद्दल वळसे-पाटील असं बोलले, कारण…; वाचा खुलासा

शिशिर धारकरांसमोर सोपा मार्ग होता, तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये जाऊ शकला असतात. पण वॉशिंग मशीनमध्ये जायच्या आधी तुम्ही लढवयांच्या सेनेत आलात, कर नाही त्याला डर कशाला असे विधान करून उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुम्ही आता लढवय्यांच्या शिवसेनेत आला आहात. आता संपूर्ण चांदा ते बांदा आपल्याला बदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही असे म्हणतात, पण शहाणपणाची सत्ता आपल्याला आणायची आहे. मूर्ख बनवण्याचे उद्योग सुरु आहेत ते जास्त काळ चालणार नाही, असा चिमटा देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांनी काढला. जास्त बोलत नाही, फक्त भगवा हातातून सुटू देऊ नका आणि तुम्ही तारीख ठरवा पेणला सभा घेऊ. आता पेणमध्येच येऊन जाहिर सभेत बोलेन असा इशारा देखील ठाकरे यांनी शेवटी दिला.

दरम्यान पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर 250 गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिशिर धारकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. यावेळी शिशिर धारकर यांनी उद्धव ठाकरे यांना शब्द देत, पुढचा आमदार आपलाच असेल, असा विश्वास देखील व्यक्त केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sanjay Raut : राऊत लोकसभा लढवणार, शिवसेनेने (UBT) मतदारसंघही ठरवला!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT