“अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण…”; शिवसेनेने (UBT) चढवला हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Saamana Editorial : Shiv Sena ubt slams devendra fadnavis says bjp leader are drama king
Saamana Editorial : Shiv Sena ubt slams devendra fadnavis says bjp leader are drama king
social share
google news

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवरून ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखातून काही सवाल केले असून, भाजप आणि त्यांचे नेते एक नंबरचे नौटंकीबाज लोक आहेत, असं टीकास्त्र डागलं आहे.

ADVERTISEMENT

झालं असं की तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून अकोल्यातील खारपट्टी भागात येणाऱ्या 69 गावांना पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. मात्र, हे आरक्षण शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले. सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे आक्रमक झाले आणि त्यांनी अमरावती ते नागपूर अशी संघर्ष पदयात्रा काढली होती.

नागपूरजवळ पोहोचल्यानंतर आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना पोलिसांनी अटक केली. या पोलिसी कारवाईवरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून टीका केली आहे.

हे वाचलं का?

नौटंकीबाज लोक, फडणवीसांना टोला

अग्रलेखात म्हटलं आहे की, “भारतीय जनता पक्ष व त्यांचे पुढारी एक नंबरचे नौटंकीबाज लोक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा एक फोटो स्वतःच प्रसिद्ध केला. टेबलावर फायलींचा ढिगारा असून ‘मिशन नो पेंडन्सी’च्या नावाखाली देवेंद्र महोदय फायली क्लीअर करताना त्या छायाचित्रात दिसत आहेत. वास्तविक कामाचा डोंगर मंत्रालयात साचला आहे आणि देवेंद्र त्या डोंगरावर आक्रमण करीत आहेत हे खरेच आहे, पण त्या फायली नक्की कोणाच्या आहेत? रोजगार, पाणी, शेतकरी यांच्याबाबत त्या फायली आहेत काय?”

हेही वाचा >> Sanjay Raut : ‘किती पापं लपवणार?’, राऊत देवेंद्र फडणवीसांवर संतापले, दाखवला Video

“अकोल्यातील पाणीप्रश्न पेटला आहे व त्या प्रश्नाची सोडवणूक करणारी फाईल देवेंद्र महोदय क्लीअर करायला तयार नाहीत. अकोल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख हे या पाणीप्रश्नावर शेकडो लोकांसह पायी निघाले. त्यांना देवेंद्र फडणवीस यांना अकोल्यातील क्षारयुक्त, प्रदूषित, विषारी पाण्याचा नमुना दाखवायचा होता. विषारी पाण्याचे नमुने राज्यकर्त्यांच्या समोर ठेवायला लोकप्रतिनिधी जात असतील तर तो अपराध ठरतो काय? पण गुरुवारी पहाटे देशमुखांना अटक केली गेली, त्यांना नागपुरात प्रवेश करण्यापासून रोखले गेले. ही दडपशाही आहे”, असं शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Shiv Sena UBT : “फायलींच्या ढिगाऱ्यात अकोला पाणीप्रश्नाची फाईल आहे काय?”

“फडणवीस हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत व अकोल्याची जनता एक-एक घोट पाण्यासाठी तडफडत आहे. खारे पाणी, जे विषारी आहे ते पिऊन दिवस ढकलत आहे. या पाण्यामुळे अनेक जण रोगाने बेजार झाले आहेत, पण पालकमंत्री फडणवीस टेबलावर फायलीचा डोंगर निर्माण करून सहय़ा करतानाचे स्वतःचे फोटो काढून घेत आहेत. अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या फायलींच्या ढिगाऱ्यात अकोला पाणीप्रश्नाची फाईल आहे काय? तेवढे काय ते बोला”, असा सवाल फडणवीसांना शिवसेनेने (UBT) केला आहे.

ADVERTISEMENT

“खारघरला श्री सेवकांना पाण्याअभावी तडफडून मरावे लागले. ही महाराष्ट्राची खरी स्थिती आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाणी खात्याचे जे ‘गुलाबी’ मंत्री आहेत, त्यांनीच पाण्याच्या नावावर पाण्यासारखा पैसा ओरपला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या सगळय़ात मोठा भ्रष्टाचार उघडपणे सुरू आहे. त्या भ्रष्टाचाराची फाईल देवेंद्र महोदयांच्या टेबलावरील डोंगरात आहे काय?” असा प्रश्न शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपस्थित केला आहे.

हेही वाचा >> ’16 आमदार अपात्र झाले, तर…’, अजित पवारांनी केली बेरीज अन् सांगितला बहुमताचा आकडा

“विरोधी बाकांवरील आमदारांच्या मतदारसंघात लोकांना पाणीही मिळू द्यायचे नाही हा विचार अमानुष आहे आणि पाणी मागण्यासाठी निघालेल्या आमदारांना अटक करणे म्हणजे डरपोक हुकूमशहाची दंडुकेशाही आहे. विदर्भातील नेतेच वैदर्भी जनतेचे खरे शत्रू आहेत. अशा राज्यकर्त्यांच्या घशात तेच खारे पाणी ओतायला हवे. नितीन देशमुखांचे तेच पाऊल होते. त्यांना अटक झाली, पण पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहील”, असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT