शिंदे, फडणवीस, मी अन् 150 बैठका; सत्तांतराबद्दल तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट, महाराष्ट्रात खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

State Minister Tanaji Sawant statement
State Minister Tanaji Sawant statement
social share
google news

Tanaji Sawant news :

ADVERTISEMENT

धाराशिव : 2019 पासुन अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माझ्या जवळपास 100 ते 150 बैठका झाल्या, मी या सत्तांतरातील प्रत्येक आमदाराचं काऊंन्सलिंग करत होतो असं म्हणतं राज्यातील बहुचर्चित सत्तांतरावर राज्याचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात मंत्री सावंत यांनी अनेक बाबी उघड केल्या. त्यामुळे कुस्तीच्या आखाड्यातून सावंत यांनी राजकीय आखाडा पेटवला असल्याची चर्चा सुरु आहे. (State Minister Tanaji Sawant has made the biggest secret explosion on shiv Sena split)

काय म्हणाले सावंत?

“2019 पासूनच महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेला बदलायचं काम सुरु होतं. आमदारांचं काऊंसलिंग सुरु होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या बैठका होतं होत्या. एकनाथ शिंदे आणि माझ्या त्या दोन वर्षांमध्ये जवळपास 100-150 बैठका झाल्या. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक आमदारांचं मी काऊंसलिंग करत होतो. हे सांगून करत होतो, झाकून करतं नव्हतो, उजळ माथ्यानं करत होतो, असा गौप्यस्फोट मंत्री तानाजी सावंत यांनी केला.

हे वाचलं का?

गुणरत्न सदावर्तेंना राजकारण भोवलं; दोन वर्ष करता येणार नाही वकिली

सावंत यांच्या गौप्यस्फोटावर जितेंद्र आव्हाडांची टीका :

दरम्यान, सावंत यांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे, ट्विट करत आव्हाड म्हणाले, आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर 100-150 बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 100-150 बैठका घेतल्या. आमदारांच मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते.

Savarkar row: शरद पवार उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राहुल गांधींना सुनावलं!

बच्चू कडू फडणवीस यांच्या एका फोनवर गुवाहटली गेले :

दरम्यान, अपक्ष आमदार बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते. मी स्वत: त्यांना फोन केला आणि सांगितलं, आम्हाला सरकार बनवायचं आहे आणि तुम्ही सोबत हवे आहात. आमची इच्छा आह, तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं आणि ते माझ्या एका कॉलवर गुवाहटीला गेले. बच्चू कडूंनी कुणाशी सौदा केला, काही उलट-सुलट केले, हे म्हणणेच चुकीचं आहे, असं काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या आरोपांना उत्तर देताना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला होता.

ADVERTISEMENT

‘सावरकरांच्या आडून अडाणी गौरव यात्रा’, संजय राऊत शिंदेंसह भाजपवर बरसले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT