Smita Thackeray: 'त्यांनी मला सलग 3 वर्ष शब्द दिला, पण...', बाळासाहेबांविषयी स्मिता ठाकरे असं का म्हणाल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

स्मिता ठाकरेंचा गौप्यस्फोट
स्मिता ठाकरेंचा गौप्यस्फोट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्मिता ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

point

बाळासाहेबांनी स्मिता ठाकरेंना दिलेला राज्यसभेचा शब्द

point

स्मिता ठाकरेंची दिलखुलास मुलाखत

Smita Thackeray Rajya Sabha and Balasaheb Thackeray: मुंबई: शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या सून स्मिता ठाकरे यांनी नुकतंच  ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखती काही मोठे खुलासे केले आहेत. एवढंच नव्हे तर एक गौप्यस्फोट देखील त्यांनी आपल्या या मुलाखतीत केला आहे. (they promised me for 3 consecutive years but they could not give me rajya sabha candidature smita thackeray on balasaheb promising her a rajya sabha seat)

ADVERTISEMENT

'बाळासाहेबांनी सलग तीन वर्ष राज्यसभेची उमेदवारी देऊ असा शब्द मला दिला होता. पण त्यांना उमेदवारी देता आली नाही..' असं म्हणत स्मिता ठाकरेंनी एकूणच ठाकरे कुटुंबातील अंतर्गत कलह आणि राजकारण यावर बरचंस भाष्य केलं आहे. 

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंमुळे पायउतार व्हावं लागलेलं असतानाही त्यांच्याच जाहीर सभेला स्मिता ठाकरे या गेल्या होत्या. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जेव्हा शिवसेनेची सूत्रं ही बाळासाहेबांकडून उद्धव ठाकरेंकडे जाऊ लागली तेव्हा स्मिता ठाकरे या देखील साईडलाइन होऊ लागल्या. याच सगळ्यावर स्मिता ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. पण यावेळी त्यांनी कोणाचंही नाव घेणं मात्र टाळलं आहे. 

हे वाचलं का?

'बाळासाहेबांनी राज्यसभा उमेदवारीचा शब्द सलग तीनदा दिला होता. मात्र, ती न मिळण्यामागे नेमकं कोण होतं हे आज प्रत्येकाला माहिती आहे.. असं सूचक विधान स्मिता ठाकरेंनी यावेळी केलं आहे.'

स्मिता ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं.. 

'आम्ही कधी निगेटिव्ह गप्पा मारायचो नाही. फक्त एवढं होतं की, बाळासाहेबांनी मला एवढंच सांगितलं होतं की, तू महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ नकोस. कारण इथे खूप खिचडी आहे. तर त्यापेक्षा मी तुला राज्यसभेत पाठवतो. ती त्यांची इच्छा होती.' 

ADVERTISEMENT

'खरं तर ही गोष्ट मी कधी मागितली देखील नव्हती. मी फक्त त्यांना एवढंच विचारलं होतं की, माझ्यात क्षमता आहे की नाही.. तर जेव्हा त्यांनी माझं काम पाहिलं तर तेव्हा त्यांनी मला शब्दही दिला..' 

ADVERTISEMENT

'सलग तीन वर्ष ते मला शब्द देत गेले.. पण त्यांना मला राज्यसभा उमेदवारी देता आली नाही. आता त्यामागे काय कारण होतं.. कोण होतं.. हे मला माहीत नाही. आणि जरी मला माहीत असेल तरी त्याबाबत आता बोलून काहीही फायदा होणार नाही.'

'प्रत्येकाला हे माहिती आहेच की, कोणाला वाटतं की मी राजकारणात येऊ नये.. तर त्या गोष्टी अधोरेखित आहेत...'

'आमचं नातं हे तुम्ही गुरू-शिष्य म्हणा.. मी तर त्यांना माझे सासरे नाही म्हणणार.. ते त्यापेक्षा अधिक होते.. ते माझ्या वडिलांपेक्षाही अधिक ठामपणे माझ्या पाठिशी उभे राहायचे. माझ्यासाठी बाळासाहेब हे गुरू आणि सगळंच काही होते..' असं स्मिता ठाकरे यावेळी म्हणाल्या.

याशिवाय त्यांनी 'मातोश्री'मधील तसेच मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यासंबंधी अनेक आठवणींना देखील उजाळा दिला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT