“निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या अधिकारांवरच आघात केलाय”; ठाकरेंच्या याचिकेवर न्यायालयात काय झालं?
शिवसेना कुणाची हा निर्णय अजूनही झालेला नाही. ठाकरे-शिंदे निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नावासह धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आता ठाकरेंनी आव्हान दिलंय. आयोगाने पक्षाच्या लोकशाही अधिकारांवर मनमर्जीने आघात केलाय, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. आयोगाच्या या […]
ADVERTISEMENT

शिवसेना कुणाची हा निर्णय अजूनही झालेला नाही. ठाकरे-शिंदे निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नावासह धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आता ठाकरेंनी आव्हान दिलंय. आयोगाने पक्षाच्या लोकशाही अधिकारांवर मनमर्जीने आघात केलाय, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. आयोगाच्या या निर्णयाला आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने न्यायालयात आव्हान दिलंय.
ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये. या याचिकेवर सोमवारी (१५ नोव्हेंबर) सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला.
जेव्हापासून निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव, चिन्ह आणि झेंड्यावर एकतर्फी निर्णय घेत बंदी घातलीये. त्यामुळे पक्षाची कामं थांबली आहेत. कारण निवडणूक आयोगाने पक्षाच्या लोकशाही अधिकारांवरच मनमर्जीप्रमाणे आघात केलाय, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी न्यायालयात केला.