Srijaya Chavan : अशोक चव्हाणांचा मोठा डाव! मुलीची आमदारकी फिक्स?

राहुल गायकवाड

श्रीजया यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाचं सर्व काम श्रीजया सांभाळत होत्या.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Ashok Chavan Srijaya Chavan : अचानक काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी १३ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सोडण्याचं कारण यावेळी चव्हाणांनी मात्र सांगितलं नाही. महाविकास आघाडीमध्ये चव्हाणांना नांदेडची लोकसभेची जागा लढवण्यास दिली जाण्याची शक्यता होती. आता चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार, हे जवळपास निश्चित असून, त्यांच्या कन्येचीही राजकीय एन्ट्री जवळपास निश्चित मानली जात आहे. कारण आता भोकरची विधानसभेची जागा कोण लढवणार? असा प्रश्न आहे. 

भारत जोडो यात्रेपासून चर्चेत असलेली अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण हिला विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीजयाची कारकिर्द नेमकी कशी आहे, श्रीजया वडिलांची जागा घेणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभाग

राहुल गांधींची पहिली भारत जोडो यात्रा मराठवाड्यातून गेली होती. यावेळी देगलूरपासून श्रीजया चव्हाण राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्यासोबतचा श्रीजया यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच श्रीजया हिच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.

भारत जोडो यात्रेच्या मराठवाड्यातील प्लॅनिंगमध्ये श्रीजया यांचा सक्रीय सहभाग होता. श्रीजयांच्या या सहभागाबाबत अशोक चव्हाण यांनी सूचक ट्विट देखील त्यावेळी केलं होतं.

    follow whatsapp