Dahisar Firing: एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण याचबाबत बोलताना फडणवीस असं म्हणाले की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण याचबाबत बोलताना फडणवीस असं म्हणाले की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.
Devendra Fadnavis on Abhishek Ghosalkar Murder Case: मुंबई: मुंबईतील दहिसर येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर ( Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दुसरीकडे याप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. सतत घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून याप्रकरणी विरोधक फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, यावरच बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एक भलतंच वक्तव्य केलं आहे. (even if a dog comes under a car the opposition will demand resignation of the Home Minister why did Devendra Fadnavis make such a statement abhishek ghosalkar murder case)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
'अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी देखील ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या विधानावरून देखील त्यांच्यावर विरोधक निशाणा साधत आहेत.
पाहा नेमकं काय देवेंद्र फडणवीस
हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे... ही घटना तर गंभीरच आहे. पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी देखील ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. त्यामुळे या गंभीर घटनेकरिता त्यांनी राजीनामा मागितला मला काही त्यात आश्चर्य वाटत नाही. मला असं वाटतं की, या सगळ्या घटनेचं ते राजकारण करू इच्छितात. त्यांना देखील हे माहिती आहे की, ही जी काही हत्या झाली आहे ती वैयक्तिक वैमनस्यातून झाली आहे. पण ठीक आहे.. मला असं वाटतं की, ते विरोधी पक्षाचं काम करत आहेत.
असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केलं आहे.
हे वाचलं का?
राज्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, राज्यात गुन्हेगारीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे राज्यातील शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका होत आहे.
मागील महिन्याभरात राज्यात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या. ज्यामध्ये एका भाजप आमदारानेच शिवसेना नेत्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
सर्वात आधी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या जवळच्याच लोकांनी ही हत्या केल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> मित्र बनून काढला अभिषेक घोसाळकरांचा काटा; स्फोटक माहिती
या घटनेला काही दिवस होत नाही तोच कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस स्टेशनमध्येच सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी असंही विधान केलं होतं की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून गुन्हेगारी वाढली आहे आणि त्यांच्यामुळेच गुन्हेगार तयार होत आहे.
सुदैवाने या घटनेत जखमी झालेले महेश गायकवाड हे बचावले असून सध्या त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या घटनेला आठवडाही होत नाही तोच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावरही खुलेआम गोळीबार करण्यात आला. दुर्दैवाने या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या सगळ्या घटनांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच विरोधकांकडून आता सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT