एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजन का हसले?

मुंबई तक

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी हसून प्रश्न टाळला व शरद पवारांवर टीका केली.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार या विषयावर मंत्री गिरीश महाजन यांनी बोलणं टाळलं आहे. एकनाथ खडसेंचा प्रश्न विचारताच हसत हसत तोंडावर बोट ठेवत गिरीश महाजन निघून गेले. त्याआधी शरद पवारांवर मात्र टीका केली. शरद पवारांवर मात्र बांगलादेशसह इतर मुद्यांवरून टीका केली. याशिवाय लाडकी बहीण योजना चालणार नाही ती पळेल, विरोधकांकडून फक्त अपप्रचार सुरू आहे असं स्पष्टीकरणही मंत्री गिरीश महाजनांनी दिलं. शरद पवार यांनी बांगलादेश व इतर विषयांवर घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांकडून फक्त अफवा पसरवल्या जात आहेत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp