Mumbai Tak /बातम्या / Vidhan Parishad Election- आमच्यातली एकजूट संध्याकाळी दिसेल, संजय राऊत यांचा दावा
बातम्या राजकीय आखाडा

Vidhan Parishad Election- आमच्यातली एकजूट संध्याकाळी दिसेल, संजय राऊत यांचा दावा

महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांची एकजूट किती आहे ते संध्याकाळी दिसून येईलच असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. विधान परिषदेची निवडणूक आज पार पडते आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असाच सामना आजही रंगतोय. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष हातात हात घालून चालत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे हातात हात घालून चालत आहेत. आम्हाला धोका आहे आणि समोरच्यांना धोका नाही का? आमचं काय ठरलं आणि काय नाही ठरलं हे मी आत्ता सांगणार नाही. आमच्या पक्षातली एकजूट तुम्हाला दिसून येईलच

गावकडल्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार?: संजय राऊत

आमदार पक्षाच्या कँपमध्ये असतानाही दबाव टाकला जात होता, धमक्यांचे फोन येत होते. मात्र या सगळ्याचा काहीही परिणाम होणार नाही. देशात लोकशाही आहे, लोकशाही मालक निर्माण झाले असले तरहीसुद्धा महाराष्ट्रात आम्ही या सगळ्यावर मात करू. महाराष्ट्र आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. विधान परिषदेची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहेच.

Sanjay Raut : हिंदुत्वाचा बाप कोण असेल तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे!

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, मंत्री बाळासाहेब थोरात या सगळ्यांमध्ये संवाद आणि समन्वय आहे. आमच्यातली एकजूट किती आहे हे तुम्हाला संध्याकाळी दिसून येईलच असं म्हणत संजय राऊत यांनी विजयाचा दावा केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे हेच दिसून येतं आहे. काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड या दोघांमध्ये काँटे की टक्कर आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात आहेत. तर मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात आहे.

काँग्रेसकडे ४४ आमदारांचं संख्याबळ आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना जिंकण्यासाठी २६ मतं मिळणं कठीण नाही. भाई जगताप यांना जिंकण्यासाठी ८ मतं कमी पडत आहेत. या ८ मतांसाठी जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि इतर लहान पक्ष यांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + three =

राखी सावंत म्हणालेली, ‘सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं’ अनिल अंबानी जेव्हा मदतीसाठी निता अंबानींना म्हणाले होते, “Thank You भाभी” या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही! Chatbot ने असं काय सांगितलं की, तरुणाने थेट केली आत्महत्या?, AIचे खतरनाक रूप Sai Tamhankar Troll : ‘श्रीमंतांची उर्फी’ म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल! IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण? दही खाण्याचे भरपूर चमत्कारी फायदे, यापैकी तुम्हाला किती माहितीये? ‘सनी लिओनी तू भारत सोडून जा’, राखी सावंतने काय केले होते आरोप? ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार! एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या…Video व्हायरल ‘या’ 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं खास गुपित इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो Bollywood : जेव्हा प्रियांका चोप्राला दिला होता स्तनांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग! जन्मताच ‘या’ चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय? Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री