India vs Australia : डेव्हिड वॉर्नर मालिकेतून 'आऊट'; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का - Mumbai Tak - big blow to australia star player david warner out from series - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

India vs Australia : डेव्हिड वॉर्नर मालिकेतून ‘आऊट’; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

India vs Australia Series : टीम इंडियाने (Team India) मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरू असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचे दोन सामने बाकी आहेत, मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. (Big blow to Australia, star […]

India vs Australia Series :

टीम इंडियाने (Team India) मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरू असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचे दोन सामने बाकी आहेत, मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. (Big blow to Australia, star player David Warner ‘out’ from series)

वॉर्नरच्या डाव्या कोपराला दुखापत झाली असून हेअरलाइन फ्रॅक्चर झालं आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठीच तो मायदेशी परतला आहे. यामुळे वॉर्नर आगामी एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे. वॉर्नरमुळे आता ऑस्ट्रेलियाचा जवळपास अर्धा संघ मायदेशी परतला आहे. कर्णधार पॅट कमिन्ससह आतापर्यंत सह खेळाडू मायदेशी परतले आहेत.

Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; कर्णधार कमिन्स घरी परतला

ग्लेन मॅक्सवेललही जखमी :

ऑस्ट्रेलियाला कसोटीनंतर टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पण आता त्या मालिकेपूर्वीही ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीतून सावरल्यानंतर वनडे मालिकेतून पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र देशांतर्गत शेफिल्ड शील्ड ट्रॉफी खेळताना मॅक्सवेलला पुन्हा एकदा जायबंदी झाला आहे. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला.

यामुळे मॅक्सवेललाही मैदानाबाहेर जावं लागलं होत. मात्र दुखापत फारशी गंभीर नसल्यामुळे तो फलंदाजीसाठी मैदानावर परतला. पण आता त्याची दुखापत कितपत धोकादायक आहे याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. मॅक्सवेल नोव्हेंबर २०२२ पासून संघापासून दूर आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत पडल्यामुळे त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले.

Ind vs Aus test: कांगारू पुन्हा फिरकीच्या जाळ्यात, ऑस्ट्रेलियाची दाणादाण

शेवटच्या दोन कसोटी सामन्यांपूर्वी 6 खेळाडू ऑस्ट्रेलियाला परतले :

मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांपूर्वी डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ, अॅश्टन आगर आणि टॉड मर्फी हे खेळाडून ऑस्ट्रेलियाला परतले आहेत. दोन कसोटी सामने गमावल्याने ऑस्ट्रेलियन संघ आधीच अडचणीत आहे. अशात खेळाडूंची दुखापत ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचं कारण बनलं आहे.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरच्या जागी ट्रेव्हिस हेड शेवटच्या २ कसोटी सामन्यांमध्ये सलामी करताना दिसणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. तर दुसरा सलामीवीर म्हणून उस्मान ख्वाजा असणार आहे. मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर आणि 6 खेळाडू बाद झाल्यानंतर, कांगारू संघ शेवटच्या दोन कसोटीत पुनरागमन करू शकतो की नाही हे पाहावे लागेल.

Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की…