युएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात पंजाबच्या संघाकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलचं अपयश हे चर्चेचा विषय बनलं होतं. कोट्यवधींची बोली लावल्यानंतरही मॅक्सवेल पंजाबकडून आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला मॅक्सवेल युएईत एकही सिक्स मारु शकला नव्हता. यानंतर पंजाबने नवीन सिझनसाठी ग्लेन मॅक्सवेलला आपल्या संघातून रिलीज केलं.
आयपीएल २०२१ साठीच्या ऑक्शनमध्ये ग्लेन मॅक्सवेलवर कोणता संघ कितीची बोली लावतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतू गेल्या वर्षाचं अपयश लक्षात घेऊनही मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये चांगलीच चढाओढ लागली होती. अखेरीस १४ कोटी २५ लाखांच्या बोलीवर RCB ने मॅक्सवेलला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे.
Looking forward to joining @RCBTweets for this years @IPL
Can’t wait to put everything I have in to helping us lift the trophy!— Glenn Maxwell (@Gmaxi_32) February 18, 2021
नवीन सिझनमध्ये मॅक्सवेल विराट कोहलीच्या संघाकडून खेळणार आहे. RCB ला मधल्या फळीत एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची गरज होती. मॅक्सवेलची बॅटींग आणि कामचलाऊ बॉलिंग नवीन सिझनमध्ये विराटच्या RCB ला कामी येते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.