Mumbai Tak /बातम्या / जो रुटची तूफान फलंदाजी, सचिनचा रेकॉर्ड धोक्यात?; दिग्गज कर्णधाराचा मोठा दावा
बातम्या स्पोर्ट्स

जो रुटची तूफान फलंदाजी, सचिनचा रेकॉर्ड धोक्यात?; दिग्गज कर्णधाराचा मोठा दावा

कसोटी क्रिकेटमध्ये जो रुटच्या फलंदाजीचा जलवा कायम आहे. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज आताच्या काळात कसोटी क्रिकेटचा बादशहा बनला आहे. जो रुटने आपल्या १० हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केला आहे.

कसोटी क्रिकेटचा विषय चर्चेला घेतला असता, जो रुटचे नाव अव्वल स्थानावर घेतलं जातं. सध्या न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये (ENG vs NZ) कसोटी मालिका सुरु आहे. मागच्या सामन्यात जो रुटने (Joe Root) जबरदस्त शतक ठोकत इंग्लंडच्या संघाला ५ विकेटने विजय मिळवून दिला.

या शतकाबरोबरच जो रुटने १० हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केला. रुटच्या या कामगिरीने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात आला आहे.

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कसोटीमध्ये १५, ९२१ धावा केल्या आहेत. आता किक्रेट विश्वात चर्चा रंगली आहे की, जो रुट सचिनचा हा रेकॉर्ड अगदी सहज तोडू शकतो. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने ही भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला की ‘जो रुटचा फॉर्म, फिटनेस पाहता तो सचिनचा रेकॉर्ड अगदी सहज तोडू शकतो.’

जो रुट सध्या ३१ वर्षांचा आहे. मागच्या १८ महिन्यांपासून रुटचं धावा करण्यातील सातत्य कायम आहे. मार्क टेलरने त्याच्या कामगिरीतील सातत्य बघून हा दावा केला आहे.

रुटचा एकंदरीत फिटनेस पाहिला तर त्याच्यात अजून ५-६ वर्षांचे क्रिकेट बाकी आहे आणि रुटसाठी सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्ड फार काही मोठी गोष्ट नाही, असेही टेलर एका मुलाखतीमध्ये म्हणाला.

यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक सचिनच्या विक्रमाला गवसणी घालेल, असे म्हटलं गेलं होतं. परंतु तो १२ हजार धावा करु शकला. अॅलिस्टर कूक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

सचिनचा रेकॉर्ड अजून लांबची गोष्ट आहे परंतु रुटला इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी आहे.

रुटच्या आवाक्यात कोणते रेकॉर्ड?

न्यूझीलंड मालिकेमधील रुटची फलंदाजी पाहता तो अनेक रेकॉर्ड्सला गवसणी घालण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज यूनुस खान, भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांचे रेकॉर्ड रुटच्या आवाक्यात आहे.

यूनुस खानने १०,०९९ धावा केल्या आहेत, तर सुनील गावस्करने १०,१२२ धावा केल्या आहेत. या मालिकमध्ये तर हे रेकॉर्ड मोडणे शक्य झाले नाहीतर आगामी काळात रुट या रेकॉर्डला नक्कीच गवसणी घालू शकतो.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 6 =

राखी सावंत म्हणालेली, ‘सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं’ अनिल अंबानी जेव्हा मदतीसाठी निता अंबानींना म्हणाले होते, “Thank You भाभी” या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही! Chatbot ने असं काय सांगितलं की, तरुणाने थेट केली आत्महत्या?, AIचे खतरनाक रूप Sai Tamhankar Troll : ‘श्रीमंतांची उर्फी’ म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल! IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण? दही खाण्याचे भरपूर चमत्कारी फायदे, यापैकी तुम्हाला किती माहितीये? ‘सनी लिओनी तू भारत सोडून जा’, राखी सावंतने काय केले होते आरोप? ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार! एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या…Video व्हायरल ‘या’ 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं खास गुपित इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो Bollywood : जेव्हा प्रियांका चोप्राला दिला होता स्तनांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग! जन्मताच ‘या’ चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय? Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री