Gautam Gambhir gets angry on Rohit Sharma : टीम इंडियाच्या विश्वचषकातील पराभवानंतर आता भारतीय संघ अंतिम फेरीत कसा हरला याच्या उपहापोह सुरू आहे. वेगवेगळी कारणे समोर येत आहे. भारतीय संघ जेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार होता आणि कारण भारताने सलग 10 सामने जिंकले होते. रिकी पाँटिंग, नासिर हुसेन आणि हरभजन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी म्हटले होते की, अहमदाबादची खेळपट्टी पाहता संघाला त्याचा फायदा होईल असे वाटत होते, पण भारताने सामना गमावला.
केएल राहुल आणि विराट कोहली यांच्यातील 67 धावांच्या भागीदारीमुळे हे नुकसान झाल्याचे सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी सांगितले. मात्र गौतम गंभीर आणि वसीम अक्रम यांनी रोहित शर्माच्या चुकीच्या निर्णयामुळे संघ पराभूत झाला असे म्हटले आहे.
रोहितच्या निर्णयावर गंभीर-अक्रम संतापले
पॅट कमिन्सने आपल्या कामगिरीतून सामना बघण्यासाठी आलेल्या भारतीय चाहत्यांना शांत केले. विराट कोहलीच्या विकेटनंतर सूर्यकुमार यादव सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. मात्र संघ व्यवस्थापनाने रवींद्र जडेजाला त्याच्याआधी फलंदाजीसाठी पाठवले. हार्दिक पांड्या टीम बाहेर गेल्यानंतर सूर्यकुमार यादवचा स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता.
हे ही वाचा >> ‘…तेव्हा तुम्हाला धोनीची खरी किंमत कळेल’, नेहराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘स्पोर्ट्सकीडा’शी बोलताना गंभीर आणि अक्रम म्हणाले की, “रोहित शर्माच्या या निर्णयाचा दोघांनाही धक्का बसला. 2011 च्या विश्वचषक विजेता संघाचा सलामीवीर गंभीरने सांगितले की, रवींद्र जडेजाला सूर्यकुमार यादवच्या आधी का पाठवले गेले, हे मला समजले नाही. त्याला सातव्या क्रमांकावर का ठेवण्यात आले? हा माझ्यामते हा योग्य निर्णय नव्हता.”
अक्रम म्हणाला की, “सूर्यकुमार यादव फलंदाज म्हणून खेळत होता. त्याच्या जागी हार्दिक फलंदाजी करत असता, तर मला ही चाल समजली असती.” गौतम गंभीरने व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, जर या लोकांचा सूर्यावर विश्वास होता तर त्यांनी आधी का पाठवले नाही. ६व्या क्रमांकावर जाऊन तो आक्रमक क्रिकेट खेळू शकला असता. पण त्याने बचावात्मक फलंदाजी करण्याचा पवित्रा घेतला.”
Ball by Ball highlights of Surya kumar yadav 18(28) in world Cup final#SuryaKumarYadav #Indian #IndianCricket #IndianCricketTeam #INDvsAUSfinal #ImACelebrity pic.twitter.com/BvtbB9Tvbh
— Zara vibes ✨️ (@zaravibes303) November 21, 2023
हे ही वाचा >> पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या
गंभीर पुढे म्हणाला की, “केएल राहुलने विराट कोहलीसोबत वेगवान फलंदाजी केली असती, तर सूर्यकुमार यादवला पाठवणे योग्य ठरले असते. त्यामुळे सूर्याला त्याचा नैसर्गिक खेळ करता आला, कारण त्याच्यानंतर जडेजा येणार होता. कारण इथे खेळाडूची मानसिकता अशी असते की त्याच्या नंतरचा फलंदाज कोण. जर तुम्हाला 6 व्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादववर विश्वास नव्हता, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाजाला पाठवू शकला असता.”