Ind vs NZ Test : ...आणि श्रेयसने बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, पदार्पणाच्या कसोटीत खडूस शतकी खेळी - Mumbai Tak - ind vs nz kanpur test shreyas iyers father talks about unique whatsapp dp - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

Ind vs NZ Test : …आणि श्रेयसने बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, पदार्पणाच्या कसोटीत खडूस शतकी खेळी

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कानपूरच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेला पहिला कसोटी सामना गाजवला तो मुंबईकर श्रेयस अय्यरने. माजी खेळाडू सुनील गावस्कर यांच्याकडून मानाची कॅप मिळवणाऱ्या श्रेयसने पहिलाच कसोटी सामना खेळताना शतक झळकावलं. श्रेयसच्या याच शतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३०० धावांचा टप्पा ओलांडला. टीम साऊदीच्या बॉलिंगवर १७१ बॉलमध्ये १३ चौकार आणि २ षटकार लगावत […]

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कानपूरच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेला पहिला कसोटी सामना गाजवला तो मुंबईकर श्रेयस अय्यरने. माजी खेळाडू सुनील गावस्कर यांच्याकडून मानाची कॅप मिळवणाऱ्या श्रेयसने पहिलाच कसोटी सामना खेळताना शतक झळकावलं. श्रेयसच्या याच शतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३०० धावांचा टप्पा ओलांडला. टीम साऊदीच्या बॉलिंगवर १७१ बॉलमध्ये १३ चौकार आणि २ षटकार लगावत श्रेयसने १०५ धावांची इनिंग खेळली.

गेली अनेक वर्ष श्रेयस अय्यर कसोटी संघात जागा मिळवण्याच्या शर्यतीत होता. आजच्या खेळीच्या निमीत्ताने श्रेयसने आपल्या वडिलांचं जुन स्वप्न पूर्ण करत त्यांची इच्छा पूर्ण केली आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ साली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यावेळी राखीव खेळाडू म्हणून संघात असलेल्या श्रेयसचा हातात ट्रॉफी घेतलेला फोटो त्याचे वडीव संतोष अय्यर यांनी What’s app वर DP म्हणून ठेवला होता. आपल्या मुलाला कधी ना कधी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल या एकमेव आशेवर संतोष यांनी गेली ४ वर्ष हा DP बदलला नव्हता. अखेरीस ४ वर्षांनी सर्व योग जुळून आले आणि श्रेयसनेही पदार्पणाची कसोटी खेळताना धडाकेबाज कामगिरी करत आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं.

हो, हा What’s app DP माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि जवळचा आहे. धर्मशाळा मध्ये भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होता तेव्हा श्रेयसला विराट कोहलीच्या जागेवर Stand By खेळाडू म्हणून संघात जागा मिळाली होती. त्यावेळी सामना जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंनी श्रेयसला ट्रॉफी हातात धरायला दिली, माझ्यासाठी तो क्षण खरंच खूप मौल्यवान होता”, श्रेयसचे वडील संतोष पीटीआयशी बोलत होते.

Shreyas Iyer: जे सचिनलाही जमलं नाही ते श्रेयसने करुन दाखवलं, पदार्पणातच ‘यांनी’ झळकावलंय कसोटी शतक!

श्रेयसने त्यावेळी ती ट्रॉफी हातात घेतली होती, माझी मनापासून इच्छा होती की त्यावेळी श्रेयसला खेळायची संधी मिळायला हवी होती. मला नेहमी असं वाटायचं की श्रेयसला कसोटी संघात कधी स्थान मिळणार आणि त्याला आपली कामगिरी दाखवायची संधी कधी मिळणार? त्यामुळे ज्या दिवशी अजिंक्य रहाणेने जाहीर केलं की श्रेयस कानपूर टेस्टमध्ये पदार्पण करणार आहे तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. आयपीएल, वन-डे मध्ये संघात निवड होण्यापेक्षाही कसोटी संघात निवड होऊन त्याने चांगली कामगिरी करणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं. कारण कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट आहे, संतोष यांनी आपल्या मनातल्या भावना मांडल्या.

मी अनेकदा त्याच्याशी बोलायचो की तुला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळायला हवी त्यावेळी श्रेयस म्हणायचा की लवकरच ती संधी मला मिळेल. आज ती संधी मिळाली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झालाय, असं श्रेयसचे वडील म्हणाले. श्रेयस हा पक्का मुंबईकर, वरळी भागात राहणाऱ्या श्रेयसने मुंबईच्या मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवत खडूस वृत्ती आपल्या बॅटींगमध्ये आणली. मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचं स्थान असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याचंही प्रतिनिधीत्व केलंय. सुनील गावसकरांच्या हातातून श्रेयसला पहिल्या दिवशी भारताची टेस्ट कॅप मिळाली, यानंतर ज्यावेळी संघ संकटात होता. तेव्हा रविदंर जाडेजासोबत महत्वाची इनिंग खेळत श्रेयसने भारताचा डाव सावरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 16 =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!